Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man Dharmendra
हिंदी चित्रपटसृष्टीचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे… १० नोव्हेंबर २०२५ रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालेल्या धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु असून सुत्रांच्या माहितीनुसार सध्या त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे…. एकीकडे त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असताना त्यांच्या कुटुंबियांनी मीडियाला अशा बातम्या न पसरवण्याची विनंती केली आहे… धर्मेंद्र यांचे चाहते त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करत आहेत…

धर्मेंद्र यांनी लहानपणापासूनच फिल्मी दुनियेत येण्याचं स्वप्न पाहिलं… दिलीप कुमार यांना आपले अभिनयातले आदर्श माननाऱ्या धरमपाजींनी पंजाब ते मुंबई हा प्रवास केला आणि संपूर्ण बॉलिवूड आपल्या अभिनयानं काबिज केलं… आज जाणून घेऊयात पद्मभूषण धर्मेंद्र यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

धर्मेंद्र सिंग देओल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आणि चित्रपटांची आवड होती… किशोर कुमार यांचे चाहते असणाऱ्या धर्मेंद्र यांनी त्यांचा ‘शहीद’ चित्रपट पाहून अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं असं मनाशी पक्क केलं होतं… (Entertainement)
१९७० ते १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीचे धर्मेंद्र बादशाह होते… तसेच, ८०च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव होतं…

बॉलिवूडमध्ये एकाच वर्षात तब्बल ७ सुपरहिट चित्रपट देणारे ते एकमेव अभिनेते आहेत… १९८७ मध्ये त्यांनी हा रेकॉर्ड केला होता…
इतकंच नाही तर, ७०च्या दशकात मोस्ट हॅन्डसम मॅन इन द वर्ल्ड यासाठी जगभरात वोटींग झालं होतं आणि सर्वाधिक वोट्ससह हे टायटल जिंकणारे धर्मेंद्र हे भारताचे पहिले अभिनेते ठरले होते… शिवाय, टाईम्स मॅगझिनमध्ये जगातील सर्वात हॅन्डसम पुरुषांच्या यादीत धर्मेंद्र यांच्या नावाचा समावेश आहे…
================================
हे देखील वाचा : Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!
================================
धर्मेंद्र यांनी black and white ते कलर चित्रपट हा प्रवास करत २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत… तसेच, बरेच रेकॉर्ड नावावर असणाऱ्या धमेंद्र यांच्या नावावर Highest Grossing Star of All time या यादीत चौथ्या क्रमांकाचा देखील रेकॉर्ड आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi