Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

Shashi Kapoor : हिंदी ते इंग्रजी चित्रपटसृष्टीचा प्रवास करणारे शशी कपूर!
हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की काही स्टार कुटुंबांची नावं नक्कीच येतात ती म्हणजे कपूर, बच्चन कुटुंब. ९० वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या कुटुंबाने घालवलं त्या कुटुंबातील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांची आज (१८ मार्च) ८७ वी Birth Anniversary. शशी कपूर यांनी आपल्या अभिनय आणि देखण्या रुपाने वडिल पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरु ठेवली होती. दीवार, कभी कभी, सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील त्यांची भूमिका खरंच अजरामर आहे. शशी कपूर यांनी केवळ हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हे तर रंगभूमी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीसाठीही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अभिनयापलिकडे शशी कपूर निर्माते आणि रंगभूमीचे चाहते होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी…(Shashi Prithviraj Kapoor)
शशी कपूर यांचं खरं नाव बलबीर राज कपूर असं होतं. कालांतराने त्यांनी शशी कपूर हे नाव सिनेइंडस्ट्रीसाठी स्वत:ला ठेवलं आणि नंतर आजन्म शशी कपूर याच नावाने त्यांची ओळख भारतीय चित्रपटाच्या इतिहासात नोंदवली गेली. इतकंच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील काही ठराविक कलाकारांपैकी शशी कपूर असे अभिनेते आहेत ज्यांनी १२ इंग्रजी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. यात The Householder, Shakespeare-Wallah, Bombay Talkie आणि The Deceviers या चित्रपटांचा समावेश आहे. (Bollywood untold stories)

शशी कपूर यांनी ज्यावेळी अभिनयात सुरुवात केली होती त्यावेळी १९५० मध्ये आलेल्या संग्राम या चित्रपटात त्यांनी तरुण वयातील अशोक कुमार यांची भूमिका साकारली होती. तसेच, स्टार कलाकार म्हणून नावारुपास येण्यापूर्वी शशी कपूर यांनी १९४८ मध्ये ‘आग’ आणि १९५१ मध्ये ‘आवारा’ या दोन्ही चित्रपटात बालकलाकाराची भूमिका देखील साकारली होती. (Entertainment gossip)

तर, मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे शशी कपूर (Shashi Kapoor) केवळ अभिनेते नव्हते तर निर्माते देखील होते. त्यांनी स्वत:च Film Valasहे प्रोडक्शन हाऊस १९७०च्या काळात सुरु केलं होतं. या बॅनरखाली शशी यांनी कर्मशिअल चित्रपटांऐवजी ऑफबिट चित्रपटांची निर्मिती केली होती. यात जुनून, कलियुग, विजेता, उत्सव अशा काही चित्रपटांचा समावेश आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कलेचा वारसा शशी कपूर यांना ज्यांच्याकडून लाभला ते म्हणजे त्यांचे वडिल पृथ्वीराज कपूर. आणि त्यांच्या आठवणीसाठी शशी कपूर यांनी १९७८ मध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना करुन भारतीय नाट्यसृष्टीसाठी एक महत्वाचं व्यासपीठ उभारलं. (Indian cinema)
=========
हे देखील वाचा : जेव्हा ऋषी कपूरच्या सांगण्यावरून अमिताभला सिनेमातून काढून टाकले!
=========
शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्या अधिक चित्रपटांबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी ‘क्लर्क’, ‘फर्ज की जंग’, ‘आखरी मुकाबला’, ‘प्यार की जीत’, ‘सिंदूर’, ‘स्वाती’, ‘बेपनाह’, ‘एक में एक तू’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली होती. जेव्हा जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहास डोकावले जाईल तेव्हा शशी कपूर यांचं नाव नक्कीच घेतलं जाईल. (Bollywood nostalgia)