Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

या आहेत बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय पण असफल प्रेम कहाण्या 

 या आहेत बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय पण असफल प्रेम कहाण्या 
कलाकृती तडका

या आहेत बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय पण असफल प्रेम कहाण्या 

by Team KalakrutiMedia 13/09/2022

बॉलिवूडच्या बहुतांश चित्रपटांचं कथानक प्रेमकहाणीवर आधारित असतं. कधी ‘एक दुजे के लिए’ म्हणत दुनियेशी पंगा घेणारे प्रेमी, तर कधी एकतर्फी प्रेमाची अंगावर काटा आणणारी कहाणी.. एक ना अनेक कथा. प्रेम, विरह, दुःख प्रेमाच्या कितीतरी रंगांची पडद्यावर उधळण करणाऱ्या बॉलिवूडच्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाण्यांची चर्चाही अगदी चवीने चघळली जाते. पण बॉलिवूडच्या काही प्रेमकहाण्या अशा आहेत ज्या ऑनस्क्रीन तर लोकप्रिय झाल्या पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र दुर्दैवाने असफल ठरल्या. अशाच काही प्रेमकहाण्यांविषयी (Unsuccessful Love Stories Of Bollywood) –

दिलीप कुमार – मधुबाला 

‘आरस्पानी सौंदर्य’ असं म्हटल्यावर फक्त एकच चेहरा समोर येतो, तो म्हणजे अभिनेत्री मधुबाला. मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्रेमकहाणी त्याकाळी खूप चर्चेत होती. हे दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते. पण मधुबालाच्या वडिलांना त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. तरीही दिलीप कुमारशी लग्न करण्याच्या निर्णयावर मधुबाला ठाम होती. या दोघांचं लग्न होणार असं वाटत असतानाच मधुबालाने हे नातं तोडायचा निर्णय घेतला. याचं कारण होतं दिलीपकुमाच्या दोन अटी. यापैकी एक म्हणजे लग्नानंतर मधुबालाने चित्रपटांमध्ये काम करायचं नाही आणि आपल्या वडिलांशी संबंध तोडून टाकायचे. मधुबालाला या दोन्ही अटी मान्य नव्हत्या त्यामुळे तिने हे नातं तोडून टाकलं आणि एक प्रेमकहाणी पूर्ण होता होता अधुरी राहिली. 

देव आनंद – सुरैय्या 

देव आनंद – सुरैय्या ही जोडी ऑनस्क्रीन प्रचंड हिट होती. पडद्यावर प्रेम करता करता दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. देव बाबूंनी सुरैय्या त्यांचं पहिलं प्रेम असल्याचं खुलेआम सांगितलं होतं. परंतु सुरैय्याच्या आजीने त्यांच्या या नात्याला कडाडून विरोध केला कारण देव बाबू आणि सुरैय्या दोघांचे धर्म वेगवेगळे होते. सुरैय्याने देव बाबूंशी विवाह केला नाही, परंतु आजन्म अविवाहित आपल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहिली. (Unsuccessful Love Stories Of Bollywood)

राज कपूर -नर्गिस 

राज कपूर – नर्गिस यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमधली दर्दभरी प्रेमकहाणी म्हणून ओळखली जाते. हे दोघे जेव्हा प्रेमात पडले तेव्हा राज कपूर आधीपासूनच विवाहित होते. राज कपूर यांना आपलं वैवाहिक जीवन आणि नर्गिसचं प्रेम या दोन्ही गोष्टी हव्या होत्या. नर्गिसला जेव्हा हे कळलं तेव्हा ती पूर्णपणे कोलमडली आणि तिने हे नातं संपवायचा निर्णय घेतला. या घटनेमुळे नर्गिस आतून खूप तुटली होती, पण तिला सुनील दत्तच्या प्रेमाचा आधार मिळाला आणि तिचं आयुष्य नव्याने सुरु झालं. 

अमिताभ -रेखा 

आजही ही प्रेमकहाणी बॉलिवूडची एव्हरग्रीन प्रेमकहाणी म्हणून ओळखली जाते. हे दोघे जेव्हा प्रेमात पडले तेव्हा अमिताभ आधीपासूनच विवाहित होते. त्यावेळी रेखामुळे अमिताभच्या संसारात वादळ उठलं होतं. पण जया बच्चन यांनी मोठ्या हिंमतीने परिस्थिती आणि संसार सावरला. असं म्हणतात की, १९८१ साली आलेला यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ हा चित्रपट जया- अमिताभ-रेखाच्या खऱ्या कथेवर आधारित होता. (Unsuccessful Love Stories Of Bollywood)

सलमान खान – ऐश्वर्या राय 

बॉलिवूडमध्ये आजही या दोघांच्या प्रेमकहाणीचे किस्से चर्चिले जातात. सलमान खान आणि ऐश्वर्या राय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकत्र आले. सलमानची याआधी कित्येक अफेअर्स झाली होती, पण ऐश्वर्याच्या बाबतीत मात्र तो सिरिअस असल्याचं बोललं जात होतं. सलमान त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होता, तर ऐश्वर्या स्ट्रगल करत होती. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट सुपरहिट झाला आणि ऐश्वर्याच्या कारकिर्दीची घोडदौड सुरु झाली. एकीकडे तिची यशस्वी कारकीर्द घडत होती, तर दुसरीकडे सलमान तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता. अखेर या साऱ्या प्रकाराला कंटाळून ऐश्वर्याने हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला. 

================

हे ही वाचा: ग्रेसी सिंग: ‘लगान’ चित्रपटाची ‘ही’ नायिका सध्या जगतेय एक ‘वेगळेच’ जीवन…

‘या’ कारणासाठी किरण रावने आमिर खानला चक्क तीन आठवडे ठेवले कोंडून

===============

रणबीर कपूर – दीपिका पदुकोण 

रणबीर आणि दीपिका यांची कहाणी सुरु होण्यापूर्वी रणबीरचं नाव अनेक नायिकांसोबत जोडलं गेलं होतं. हे दोघं लग्न करणार असं वाटत असतानाच अचानक रणबीर आणि कतरिनाच्या प्रेमकहाणीची चर्चा सुरु झाली. खरंतर त्यावेळी कतरिनाची सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु ती सलमानच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळली होती. याच काळात तिच्या आयुष्यात रणबीर आला आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. रणबीरने दिपीकाशी ब्रेक अप करून कतरिनाशी नातं जोडलं. या गोष्टीमुळे दीपिका पूर्णपणे कोलमडली. पण यामधून सावरून तिने आपल्या कारकिर्दीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि रणवीर सिंगच्या साथीने आपलं नवं आयुष्य सुरु केलं. कतरिनाने विकी कौशल, तर रणवीरने आलियाशी लग्न करून आपलं वैवाहिक आयुष्य सुरु केलं आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Love Stories Of Bollywood
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.