Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा सैफ अली खानने केली होती शशी कपूरची गुंडांपासून सुटका…

 जेव्हा सैफ अली खानने केली होती शशी कपूरची गुंडांपासून सुटका…
कलाकृती विशेष

जेव्हा सैफ अली खानने केली होती शशी कपूरची गुंडांपासून सुटका…

by धनंजय कुलकर्णी 27/07/2022

दिग्दर्शक प्रयागराज १९७३ साली एक चित्रपट दिग्दर्शित करीत होते. ‘पाप और पुण्य’ हा चित्रपट सत्तरच्या दशकातील टिपिकल मसाला पट होता. सिनेमाला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते. गायिका कांचन यांनी या चित्रपटापासून पार्श्वगायनाची सुरुवात केली. या चित्रपटात शशी कपूर डबल रोल मध्ये होता, तर शर्मिला टागोर, असरानी, अजित, अरुणा इराणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही. आज कुणाला या सिनेमाचे नाव आठवण्याची सुतराम शक्यता नाही. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक किस्सा अत्यंत मनोरंजक आहे. हा किस्सा अभिनेता सैफ अली खान यांच्या लहानपणीचा किस्सा आहे. 

या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान मध्ये चालू होते. शशी कपूर आणि शर्मिला टागोर हे दोघेही आपल्या कुटुंबासमवेत राजस्थानमध्ये उपस्थित होते. त्यावेळी सैफ अली खान केवळ तीन वर्षाचा होता. (जन्म : १६ ऑगस्ट १९७०). लहान सैफ सेटवर सगळ्या युनिटचा  लाडका  होता. अभिनेता शशी कपूर सोबत त्याची  खूपच मैत्री झाली होती. (Untold story of Saif Ali Khan & Shashi Kapoor)

शशी कपूर रोज शूटिंग झाल्यानंतर सैफला बाहेर फिरायला घेऊन जात असत. त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत असल्यामुळे त्याला बरेचदा शशी कपूर हे आईस्क्रीम घेऊन देत असत.  त्याचे सगळे लाड  शशी कपूर पुरवत असे. सैफ सेटवर देखील नेहमी शशी अंकलच्या मागे मागे असायचा. या दोघांची खूपच गट्टी झाली होती. सैफ साठी शशी अंकल म्हणजे ‘बेस्ट फ्रेंड’ होता. 

या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान एक फाईट सीन चालू होता. एक गुंड शशी कपूरला मारत असतो, असं दृश्य होतं. गुंडाची भूमिका करणाऱ्या कलाकाराने शशी कपूरची मान आपल्या हातामध्ये दाबून ठेवली आणि शशी कपूर आपली मान त्याच्या हाताच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य चित्रित होत असताना कॅमेरा दोघांच्याही चेहऱ्यावर होता. (Untold story of Saif Ali Khan & Shashi Kapoor)

शशी कपूर मोठा प्रयासाने आपला चेहरा त्याच्या वज्रमुठीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो खलनायक हाताने मात्र त्याची मान मुरगळत असतो. दोन-तीन रिहर्सल झाल्या. फायनल टेक घेत असताना अचानक खलनायकाची भूमिका करणारा कलाकार जोरात किंचाळला, ओरडला आणि त्याने हाताची पकड ढिली केली.  

कॅमेरा चेहऱ्यावर झूम असल्यामुळे कुणालाच काही कळाले नाही. पण दिग्दर्शकाने कट कट असा आवाज केला. तो खलनायकाची भूमिका करणारा कलाकार मोठ्या वेदनेने विव्हळत होता. सगळ्यांना सुरुवातीला काहीच कळले नाही. पण नंतर लक्षात आले की, लहानग्या सैफने त्या खलनायकाच्या पायाचा कडकडून चावा घेतलाय आणि तो त्याचा पाय सोडायला तयार नाही!  (Untold story of Saif Ali Khan & Shashi Kapoor)

==============

हे देखील वाचा – ओंकारा: लंगडा त्यागीची भूमिका आमिरला डावलून सैफला का दिली?

==============

सेटवर सगळेजण जोरजोरात हसू लागले. शशी कपूरने सैफला ‘नो’ नो’ म्हणत दूर करण्याचा प्रयत्न केला. पण सैफ काही ऐकायला तयार नव्हता. त्याने हातात येईल ती सेटवरची वस्तू त्या खलनायकाला फेकून मारायला सुरुवात केली. चिमुकल्या हाताने त्याला तो बुक्के मारायला लागला! कारण त्याच्या लाडक्या शशी अंकलला ती व्यक्ती मारत होती, हे त्याला सहन होत नव्हतं. त्याच्या परीने गुंडाच्या तावडीतून तो आपल्या शशी अंकलला सोडवत होता. युनिट वरील सगळ्यांचे हसणे चालू होते, पण खलनायकाची भूमिका करणारा कलाकार मात्र सैफच्या दंत दंशाने  विव्हळत होता!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment Saif Ali Khan Shashi Kapoor
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.