Upendra Limaye : प्रेम, विश्वासघात अन् जिद्द; ‘माझी प्रारतना’चा टीझर रिलीज
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात विविध विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. सामाजिक, भयपट, रोमॅंटिक, कॉमेडी अशा विविध पठडीतील चित्रपट मेकर्स प्रेक्षकांच्या स्वाधीन करत आहेत. आता ‘माझी प्रारतना’ हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला, पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही. अशीच एक अभूतपूर्व प्रेमकथा ‘माझी प्रारतना’मध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. (Upendra Limaye)
प्रेम, प्रेमातील विश्वासघात आणि त्या विकट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द ‘माझी प्रारतना’ चित्रपटाच्या टिझरमध्ये पाहायला मिळते. टीझरमधून कळतं की ‘माझी प्रारतना’ चित्रपट ब्रिटिश काळात, महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडताना दिसतो. विशेष म्हणजे ही. एक संगीत प्रधान प्रेम कथा आहे. (Marathi upcoming movies)
===========
हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
===========
‘माझी प्रारतना’ या चित्रपटात उपेंद्र लिमये (Upendra Limaye) एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर हेच मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत अनुषा अडेप देखील झळकणार आहेत. ब्रिटीश काळातील प्रेमकथा मांडणारा ‘माझी प्रारतना’ चित्रपट ९ मे २०२५ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. (Marathi movies)
Upendra Limaye starrer movie mazi Prartana teaser release Marathi info