Susheela-Sujeet : बाल्कनीमधून ‘सुशीला-सुजीत’ का ओरडत आहेत हे लवकरच कळणार!

वाढदिवस स्पेशल : ‘या’ एका गाण्याने बदलावले उषा मंगेशकर यांचे आयुष्य
भारतीय संगीताला उंची मिळून देण्यामध्ये आणि जागतिक ओळख देण्यामध्ये अनेक मोठमोठ्या लोकांचे महत्वाचे योगदान आहे. या संगीताचा इतिहास अनेक लोकांच्या नावाशिवाय निव्वळ अपूर्ण आहे. भारतीय संगीताला मोठी ओळख मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, तो मंगेशकर घराण्याचा. मंगेशकर कुटुंबातील सर्वच लोकांनी संगीत क्षेत्रामध्ये येऊन आपले योगदान दिले. याच मंगेशकर कुटुंबाचा मोठा आणि महत्वाचा भाग म्हणजे उषा मंगेशकर.
लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या उषा यांनी देखील आपल्या आवाजाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. आज याच उषा मंगेशकर त्यांचा ८९ वा वाढदिवस साजरा करत आहे. उषा मंगेशकर या लता दीदी आणि आशा भोसले यांच्या इतक्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाल्या नसल्या तरी त्यांनी गायलेली सर्वच गाणी ब्लॉकबस्टर ठरली. आज उषा मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी मध्य प्रदेशात झाला. दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले तेव्हा उषा केवळ सहा वर्षांच्या होत्या. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर उषा आणि त्यांच्या भावंडांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. आर्थिक तंगी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. अशातच लता मंगेशकर यांनी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश करत गायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ इतर भावंडं देखील या क्षेत्रात हळूहळू आली. उषा यांनी देखील मनोरंजनविश्वात गायिका म्हणून अनेक गाणी गायिली.
उषा मंगेशकर यांनी हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आसामी आणि कन्नड आदी विविध भाषांमध्ये असंख्य गाणी गायली. उषा मंगेशकर यांनी पार्श्वगायिका म्हणून संगीत क्षेत्रात प्रवेश केला. १९५५ साली आलेल्या ‘आजाद’ सिनेमातील ‘अपलम चपलम’ या गाण्याने उषा मंगेशकर यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आजही हे गाणं तुफान लोकप्रिय आहे.
त्यानंतर उषा मंगेशकर यांनी १९७५ साली आलेल्या ‘जय संतोषी मां’ या चित्रपटातील ‘मैं तो आरती उतारो रे’ हे गाणं गायले आणि हे गाणे तर ब्लॉकबस्टर ठरले. आजही या गाण्याचे वेड लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले होते.
मराठीमध्ये सुद्धा त्यांची जवळपास सर्वच गाणी तुफान गाजली. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाल लाजरी’, ‘शालू हिरवा’, आदी अनेक गाणी त्यांनी गायिली आजही ही गाणी लोकं तितक्याच आवडीने ऐकताना दिसतात. चित्रपटातील गाण्यांसोबतच भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीत आदी अनेक प्रकारची नानाविध गाणी त्यांनी गायली.
उषा मंगेशकर जितक्या चांगल्या, उत्तम गायिका आहेत तेवढ्याच ताकदीच्या त्या चित्रकार देखील आहेत. नाना वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं वापरून चित्र काढण्यात आणि ते रंगवण्यात त्यांच्या हातखंडा आहे. व्यक्तीला समोर बसवून त्यांची लाईव्ह चित्र काढण्यावर तर त्यांनी मास्टरी केली आहे. त्यांनी काढलेली मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि लता दीदी यांची चित्रे अतिशय भावपूर्वक आणि जिवंत वाटतात.
‘सुबह का तारा’, ‘जय संतोषी मां’, ‘आझाज’, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इनकार अशा अनेक हिंदी सिनेमांतील उषा मंगेशकर यांची गाणी खूप गाजली. दादा कोंडके यांच्या सिनेमांसाठी त्यांनी गायलेल्या सर्वच गाण्यांना आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाही.