Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!

“पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्या मुलाने खुप काही….”; अहानबद्दल बोलताना

‘या’ मराठी महिला दिग्दर्शकांनी गाजवलाय Indian Cinema!

Bigg Boss Marathi 6: पहिल्या दिवशी राडा, दुसऱ्या दिवशी थेट

Bigg Boss Marathi 6: ‘तुझं तोंड शेणात घाल..’ पहिल्याच दिवशी

जेव्हा Mohamamd Rafi यांच्या डब्यात गेलेल्या गाण्याच्या ट्यूनवरील किशोर यांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“या पुढे मराठी मार खाणार नाही”; Dhurandharला टक्कर देणाऱ्या ‘उत्तर’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

 “या पुढे मराठी मार खाणार नाही”; Dhurandharला टक्कर देणाऱ्या ‘उत्तर’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
मिक्स मसाला

“या पुढे मराठी मार खाणार नाही”; Dhurandharला टक्कर देणाऱ्या ‘उत्तर’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

by रसिका शिंदे-पॉल 20/12/2025

मराठी चित्रपटांना कायम रिलीज झाल्यानंतर बॉलिवूड चित्रपटांचा सामना करावा लागतोच… त्यात आता भर म्हणून साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांचीही भर पडली आहे… असंच काही चित्र सध्या दिसतंय… आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची सगळीकडेच हवा आहे… ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकंना वेड लावलं आहे… परतुं, या सगळ्यात क्षितीज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ (Uttar Marathi Movie) हा मराठी चित्रपट धुरंधरला टफ फाईट देत आहे… ‘धुरंधर’च्या लाटेत १२ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘उत्तर’लाही जबरदस्त प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे… हिंदीच्या तुलनेत आपला मराठी सिनेमा शोज कमी असूनही टिकून आहे आणि अजूनच वाढतोय याबद्दल क्षितिज पटवर्धनने लक्षवेधी पोस्ट लिहिली आहे.

क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “यापुढे मराठी मार खाणार नाही! चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर ‘धुरंधर’ आणि चार पाच वर्षातून एकदा येणार ग्लोबल फेनॉमेना ‘अवतार’ यांच्या सोबत माझा पहिला सिनेमा ‘उत्तर’ प्रदर्शित झाला. ‘धुरंधर’ ने रणवीर च्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. बावीस बावीस शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं कि व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी आजिबात तक्रार करायची नाही, मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही. उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं.” (Marathi movie 2025)

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “१२ ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला, पण तेव्हाच वाटलं की सिनेमा १९ला रिलीज होतोय असं ट्रीट करूया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली, सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली. परीक्षणं अप्रतिम आली, वीकडेज ला सुद्धा शहरी सेंटर्स मध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हल ला सिलेक्शन झालं. बुक माय शो वर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतायत. आमच्याकल्पनांची दखल घेतायत. आज दुसरा विकेंड आहे आणि ६ ठिकाणी शोज वाढले आहेत. अवतार चे रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशा वेळी ‘मराठी फॅमिली फिल्म’ म्हणून ‘उत्तर’ चं पोझिशनिंग केलं, ज्याला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय! अशी वेळ या आधी आणि या पुढे अनेक मराठी सिनेमावंर येणार आहे, तेव्हा स्वतःच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं कि या सगळ्यात एक मेसेज जाणं गरजेचं होतं कि कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!” (Entertainment news in marathi)

================================

हे देखील वाचा : Marathi Movie Review : प्रत्येक आई आणि तिच्या मुलाने पाहावा असा ‘उत्तर’

================================

दरम्यान, ‘उत्तर’ हा चित्रपट क्षितीज पटवर्धन यांचं पहिलंच दिग्दर्शन असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद चित्रपटाला मिळत आहे… यात रेणूका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांची प्रमुख भूमिका असून आजच्या काळातील आई-मुलाच्या नात्याची एक वेगळी गोष्ट यात मांडण्यात आली आहे… शिवाय, ह्रता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्याही चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत… (Uttar Marathi Movie) (Uttar movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhinay Berde bollywood movie dhurandahr kshitij patwardhan Marathi Movie Renuka Shahane uttar movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.