
V Shantaram यांच्या अजरामर ‘पिंजरा’ चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट!
भारतात चित्रपटाचा पाया रचला तो एका मराठी माणसानेच आणि जगभरात ४०-५०च्या दशकात भारतीय चित्रपटष्टीचा झेंडा फडकवला तो ही एका मराठमोळ्या दिग्दर्शकानेच… आणि ते दिग्दर्शक म्हणजे द ग्रेट व्ही शांताराम (V. Shantaram) … शांताराम बापूंनी परदेशातील बऱ्याच फिल्मी ट्रीक्स भारतात आणि स्पेशली मराठी चित्रपटसृष्टीत आणण्याचा प्रयत्न केला… आणि त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे ‘पिंजरा’ (Pinjara Mrathi Movie) चित्रपट… १९७२ साली रिलीज झालेला पिंजरा हा पहिला रंगीत मराठी चित्रपट होता आणि विशेष म्हणजे तो कर्मशिअली फारच सक्सेसही झाला होता… चला तर आज जाणून घेऊयात मराठी चित्रपटसृष्टीतील या आयकॉनिक पिंजरा चित्रपटाच्या हटके गोष्टी…

सर्वात आधी तर ‘पिंजरा’ चित्रपट नेमका तयार झाला तरी कसा याची इंटरेस्टिंग स्टोरी जाणून घेऊयात… तर झालं असं की, शांताराम बापूंचा ’जल बिन मछली, नृ्त्य बिन बिजली’ असा एक चित्रपट आला होता तो सपशेल आपटला… आणि त्या चित्रपटाला तयार करण्यासाठी लागलेला खर्च आता बापूंच्या अंगाशी आला होता… तो रिक्व्हर कसा करायचा याचा विचार करत असताना त्यांना अनंत माने या आपल्या जुन्या सहकाऱ्याची आठवण झाली… मानेंकडे बापू गेले आणि त्यांना सांगितलं की, मुळच्या ‘ब्लू एंजल’ आणि ‘नोरा प्रेण्टिस’ या दोन इंग्लिश सिनेमावर आधारलेली ही कथा असणार आहे… “कथा, तंत्रज्ञ, कलाकार सगळं तु ठरव फक्त हिरोईन संध्या (Sandhya) असेल ही एक अट आहे”… मग काय इतक्या वर्षांनी शांताराम यांनी दाखवलेला विश्वास अनंत यांनी सार्थकी लावला आणि पिंजरा चित्रपटाची कथा तयार झाली… (Marathi Movie 1972)

‘पिंजरा’ चित्रपट आयकॉनिक ठरण्यासाठी बेस्ट दिग्दर्शन, कथा आणि गाणी हा महत्वाचा भाग आहेच पण त्याहूनही महत्वाचं आहे ते म्हणजे डॉ. श्रीराम लागू (Dr Shreeram Lagoo) यांचं काम… पण सुरुवातीला लागूंनी कथा ऐकण्यापूर्वीच हा चित्रपट नाकारला होता… कारण, त्यांना हा एक प्युअर तमाशापट आहे असं वाटलं होतं आणि मी त्यात फिट बसणार नाही असं त्यांचं मत होतं… पण नंतर ‘पिंजरा’ चित्रपट समाजावा नेमकं काय सांगू पाहात आहे हे लक्षात आल्यावर लागूंनी होकार दिला…. (Entertainment News)

या मराठी चित्रपटाने खरं तर ७०च्या दशकात बऱ्याच हिंदी चित्रपटांच्या नाकात दम केला होता… असं सांगितलं जातं की जेव्हा ‘पिंजरा’ रिलीज झाला होता तेव्हा अनेक बॉलिवूड दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांच्या रिलीज तारखा बदलल्या होत्या… इतकंच नाही तर आज जसं वेगवेगळ्या ट्रीक्स प्रमोशनसाठी वापरल्या जातात तशीच काहीची युनिक प्रमोशनल अॅक्टिव्हिडी ७०च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत करण्यात आली होती… ‘पिंजरा’ चित्रपटाचे मोठे-मोठे पोस्टर्स लावण्याऐवजी शांताराम बापूंनी रिक्षाच्या मागे ‘पिंजरा’ असं फक्त लिहिलं होतं… त्या एका शब्दाची कुतुहूलता इतकी वाढली की परिणामी ‘पिंजरा’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला… ७०च्या दशकात १ कोटी बॉक्स ऑफिसवर कमावणारा ‘पिंजरा’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता, पुढे १९८८ मध्ये ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banawabanawi) चित्रपटाने हा रेकॉर्ड केला होता… दरम्यान, त्याकाळी पिंजराचं बजेट जवळपास ३० लाख होतं आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई करत बजेट वसूल केलं होतं…
================================
हे देखील वाचा : ….म्हणून Laxmikant Berde यांनी पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ रिजेक्ट केला!
================================
मराठी चित्रपटसृष्टीला टॅक्नीकली पुढे आणण्यासाठी व्ही शांताराम (V. Shantaram Biopic) यांचा मोठा वाटा आहे… आणि त्यामुळे मराठीतला हा पहिला रंगीत फुल लेन्थ चित्रपट थिएटर्समध्ये दाखवण्यासाठी बापूंनी थिएटर मालकांना नवीन स्क्रिन, प्रोजेक्टर आणि लेन्स दिले होते… इतकंच नाही तर या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी जगदीश खेबूडकर यांनी चक्क ११० गाणी लिहीली होती आणि त्यापैकी ९ गाणी चित्रपटात वापरण्यात आली… ‘पिंजरा’ने महाराष्ट्रातील गावागावांत लोकप्रियता मिळवली होती… मुंबईत प्लाझामध्ये हा चित्रपट तब्बल ४३ आठवडे चालला होता… बरं. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ‘पिंजरा’ हिंदीतही तयार करण्यात आला होता.. शांताराम यांनीच हिंदीत पिंजरा याच नावाने चित्रपट तयार केला होता पण तो तिथे आपटला… परंतु, शांताराम बापू आणि अनंत माने यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीला पिंजरा सारखा अजरामर चित्रपट मिळाला आणि त्याच चित्रपटापासून मराठील रंगीत चित्रपटांचं युग सुरु झालं…. (Marathi Blockbuster Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi