‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

V. Shantaram यांनी नाव दिलं आणि बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार घडला
शेक्सपिअर म्हणाला होता ‘what’s in a name’… पण मित्रांनो फिल्मी दुनियेत नावावरच सारं काही चालतं… इंडस्ट्रीत असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी आपली खरी नावं न वापरता स्क्रिन नेम बदललं आहे… यादी भली मोठी आहे पण आज आपण सुपरस्टार जितेंद्र (Jitendra) यांच्या नावाची गंमत जाणून घेणार आहोत.. त्याचं खरं नाव वेगळंच होतं पण आपल्या शांताराम (V Shantamaram) बापूंनी अर्थात द ग्रेट दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी जितेंद्र यांना हे नाव दिलं होतं..

तर, जितेंद्र यांचं मुळ नाव रवी कपूर (Ravi Kapoor), मुंबईच्या गिरगावतल्या चाळीतला हा मुलगा… त्यांचे बाबा इमिटेशन ज्वेलरी त्याकाळात बनवायचे आणि फिल्म प्रोड्युसर्सना नेऊन विकायचे… यातच व्ही शांताराम यांच्या चित्रपटांसाठीही ते दागिने देत होते… अथक परिश्रमांनंतर रवी कपूरची भेट व्ही शांताराम यांच्याशी झाली.. पण ते सहजासहजी कुणाला चित्रपटात घेत नव्हते… त्यामुळे रवीने जेव्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा शाताराम बापूंनी माझ्याकडून काही अपेक्षाच ठेवू नको असं डायरेक्ट रवीला सांगितलं… पण काही दिवसांनी शांतारामांनी रवीला राजकमल स्टुडिओत बोलावून घेतलं.. कोणता अभिनेता आजारी पडला तर तुला संधी मिळेल अशी डिल झाली.. (Jeetendra real name story)
================================
हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : उत्कृष्ट अभिनेता ते प्रतिभावान लेखक!
=================================
बरेच दिवस गेले पण रवीला संधी काही मिळाली नाही… असं असलं तरी रवी रोज महिन्याचे १५० रुपये मिळतील म्हणून तिथे जायचा आणि एकेदिवशी त्याचं नशीब पलटलं आणि व्ही शांताराम यांच्या ‘गीत गाया पत्थरो ने’ या चित्रपटासाठी रवीची निवड झाली.. अभिनय चांगला होता पण बापूंना त्याचं नाव खटकत होतं.. शेवटी त्यांनी रवी कपूरचं नामकरण केलं जितेंद्र आणि कालांतराने मराठमोळ्या दिग्दर्शकामुळे बॉलिवूडचा सुपरस्टार जितेंद्र भेटला…

जितेंद्र यांनी व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘नवरंग’ या चित्रपटात संध्या यांच्या बॉडी डबलचा देखील रोल केला होता.. शांताराम बापूंनी ब्रेक दिल्यानंतर जितेंद्र यांची गाडी सुसाट सुटली… ‘रुप तेरा मस्ताना’, ‘स्वर्ग’, ‘गेहरी चाल’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘रक्षा’, ‘सुहागन’, ‘औलाद’, ‘दोस्ती’, ‘जाल’, ‘आग और शोला’, ‘लव-कुश’ अशा २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये जितेंद्र यांनी कामं केली आणि बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या यादीत आपलं स्थान कायम केलं… (Jeetendra Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi