Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

 Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…
Varsha Usgaonkar News
मिक्स मसाला

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

by Team KalakrutiMedia 05/03/2026

Varsha Usgaonkar या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रीला मोठा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेत्री Mrinalini Jambhale यांच्यासह काही महिलांची एकूण तब्बल 47 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून Shivaji Park Police Station येथे यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून गुंतवणुकीच्या नावाखाली नेमकी कशी फसवणूक करण्यात आली याचा तपास सध्या सुरू आहे. (Varsha Usgaonkar)

Varsha Usgaonkar Cheated
Varsha Usgaonkar News

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तक्रार अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांनी केली आहे. रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या मृणालिनी यांची आरोपी अविनाश जाधव यांच्याशी आधीपासून ओळख होती. जाधव यांनी स्वतःला चित्रपट निर्माता आणि बिल्डर असल्याचे सांगत डोंबिवली येथील एका बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करण्याची ऑफर दिली होती. या प्रकल्पात पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळेल आणि वर्षभरात संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या बोलण्यावर विश्वास ठेवून नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान मृणालिनी जांभळे, वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या ओळखीतील आणखी तीन जणांनी चेक तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण 47 लाख रुपये गुंतवले.

Varsha Usgaonkar Cheated
Varsha Usgaonkar News

सुरुवातीला आरोपीने विश्वास संपादन करण्यासाठी परतावा म्हणून सुमारे साडेचार लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर त्यांनी उर्वरित रक्कम देणे थांबवले. तक्रारदारांनी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने प्रतिसाद देणे टाळल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आणि राहण्याचा पत्ता देखील बदलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Varsha Usgaonkar)

=============================

हे देखील वाचा: ‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

=============================

नंतर तक्रारदारांनी थेट डोंबिवली येथे जाऊन जाधव यांची भेट घेत पैशांबाबत विचारणा केली. मात्र “मी पैसे देणार नाही, जे करायचे ते करा,” असे उत्तर देत त्यांनी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.फसवणुकीची खात्री झाल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी सर्व तक्रारदारांनी दादरमधील Shivaji Park Police Station येथे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलिस अधिक तपशील गोळा करत आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 47 lakh cheating case Avinash Jadhav builder case Celebrity Entertainment Marathi actress fraud marathi celebrity news Marathi film industry news Mrinalini Jambhale complaint Mumbai fraud case Shivaji Park police station case Varsha Usgaonkar fraud case Varsha Usgaonkar news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.