
Thama :आयुषमान-रश्मिका ‘या’ अभिनेत्याशी करणार दोन हात!
हॉरर-कॉमेडी आणि हॉरर-थ्रिलर चित्रपटांना सध्या प्रेक्षक अधिक पसंती देताना दिसत आहेत. मॅडॉक फिल्मच्या ‘स्त्री २’ आणि ‘भेडिया’, ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडीमध्ये चित्रपटांनी प्रक्षकांना अक्षरश:वेड लावलं. या चित्रपटाच्या यशानंतर आता हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्ये थामा हा चित्रपट लवकरच येणार असून यात आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत. अशातचं आता या दोघांसोबत हॉरर- कॉमेडीच्या युनिवर्समध्ये एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. (Bollywood upcoming movies)

मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि आयुषश्यमान खुरानाचा (Ayushmann Khurrana) सामना ‘भेडिया’शी (Bhediya) अर्थात वरुन धवनशी (Varun Dhawan) होणार आहे. ‘थामा’ चित्रपटात वॅम्पायर असलेल्या आयुषमान खुरानाचा वरुण धवनच्या सामना होणार असून पुन्हा एकदा मॅडॉक फिल्मच्या भेडिया आणि थामा चित्रपटातील कलाकार एकमेकांशी भिडणार आहेत. यापूर्वी ‘स्त्री २’ मध्ये वरुण धवनने भेडियाचं रुप घेत त्यांची मदत केली होती. (Entertainment news)
===========================
हे देखील वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj : शिवराय साकारलेल्या ’या’ अभिनेत्यांना पूजतात!
===========================
गेल्या वर्षी २०२४ मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर ‘थामा; (Thama) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ‘थामा’ २०२५ मध्ये रिलीज होणार असून ‘स्त्री’ (Stree), ‘भेडिया’, ‘मुंज्या’ (Muniya), ‘स्त्री २’ नंतर ‘थामा’ हा हॉरर युनिव्हर्सचा पुढील भाग असणार आहे. मुंज्या नंतर आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे हॉरर-कॉमेडी युनिवर्समधील ‘थामा’ चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. (Bollywood horror-comedy universes)