Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तात्या सरपंचांच्या वस्त्रहरणाची गोष्ट

 तात्या सरपंचांच्या वस्त्रहरणाची गोष्ट
नाट्यकला मिक्स मसाला

तात्या सरपंचांच्या वस्त्रहरणाची गोष्ट

by रश्मी वारंग 03/06/2020

मालवणी भाषेला या नाटकाने जगभरात पोहचवलं. “अस्सल देशी वाणाचा भरजरी फार्स” असं या नाटकाचं पुलंनी वर्णन केलं होतं. या नाटकाबाबतचा एक किस्सा खुद्द मच्छिंद्र कांबळी यांनी दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत सांगीतला होता. नाटक थेट सादर होत असताना त्याक्षणाला काय घडेल हे कधीच सांगता येत नाही.  वस्त्रहरण तेव्हा तुफान गर्दीत चालू होतं.असाच कुठल्याशा नाट्यगृहात रंगलेला प्रयोग. तात्या सरपंच आणि तालीम मास्तर यांची रंगलेली जुगलबंदी प्रेक्षकांना हसून गडाबडा लोळवत होती. आणि एका प्रसंगात खुर्चीवर बसलेले तात्या उठतात आणि तावातावाने समोर बसलेल्या तालीम मास्तरांकडे जातात असा प्रसंग. मच्छिंद्र कांबळी यांची या भूमिकेवर इतकी हुकुमत होती की ते अभिनय करत आहेत असं न वाटता त्यांचं रंगमंचावरचं वावरणं अतिशय सहज असायचं. तितक्याच सहजपणे ते उभे राहिले आणि चालत समोर गेले बस्स…….. इतकीच कृती आणि प्रेक्षकांतून कडाडून टाळ्या आणि  हास्याचा नायगारा कोसळला. वास्तविक अतिशय साध्या अशा त्या कृतीत हसण्याजोगं काहीच नसल्याने मच्छिंद्र कांबळी दोन क्षण गोंधळले. लोकं का टाळ्या वाजवत आहेत, हसत आहेत त्यांना कळेना.ते आजुबाजूला पाहतात तर स्टेजवरच्या सगळ्यांचं लक्ष मच्छिंद्रजींच्या पाठीमागे होतं. मच्छिंद्रजींनी मागे पाहिलं आणि त्यांना उलगडा झाला. झालं होतं असं की, ते ज्या खुर्चीवर बसले होते तिथून एक बारकासा खिळा वर आला आला होता आणि त्याने आपली करामत दाखवली होती. तात्या सरपंचांचं धोतर त्या खिळ्यात अडकलं होतं आणि ते तरातरा चालल्याबरोबर खिळ्यात अडकलेलं धोतर टारकन् फाटून तात्या सरपंच ते खुर्ची असा एक पडदाच तयार झाला होता. त्या कृतीवर लोकं मरमुराद हसत होते. त्यांना तो नाटकातलाच प्रसंग वाटला होता. अर्थात इतका आणीबाणीचा प्रसंग असुनही मच्छिंद्र कांबळींनी तिथं अॅडीशन घेतली. “मास्तरानु द्रौपदीचा वस्त्रहरण -हवला बाजूक हय माझाच वस्त्रहरण होऊची वेळ इली” असं काही तरी म्हणत त्यांनी तो प्रसंग इतका बेमालूमपणे सांभाळला की रंगमंचावरील सगळ्यांच्याच तोंडून दाद निघाली असेल, क्या बात है! प्रेक्षकांना कळलंही नाही की स्टेजवर जे घडलं ती आयत्यावेळची अडचण होती.

आणि म्हणूनच नाटकात एक गंमत आहे. तालमी होतात, सराव होतो पण प्रत्यक्ष प्रयोगात काय होईल हे नटेश्वरालाही ठाऊक नसतं. सच्चा नाट्यकलावंत या अनपेक्षिततेत रमतो आणि चेह-याला रंग लावून पुन्हा पुन्हा नाटकातील ही गंमत, ही मौज अनुभवत रहातो.

– रश्मी वारंग

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Drama Entertainment Marathi Natak Natak Vastraharan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.