Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Katrina Kaif-Vicky Kaushal यांच्या घरी चिमुकल्या मुलाचं आगमन!
बॉलिवूडमधलं क्युट कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (Vicky Kaushal-Katrina Kaif) यांनी त्यांच्या चाहत्यांना काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा होणार असल्याची गुडन्युज दिली होती… आणि आज त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे… विकी-कॅटरिनाला गोंडस मुलगा झाला असून त्यांनी सोशल मिडियावरुन ही आनंदाची बातमी शेअर केली आहे…
विकी कौशलने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की “आमच्या लाडक्या बाळाचं आगमन झालं आहे. प्रेमाने आम्ही आमच्या बेबी बॉयचं स्वागत केलं आहे”. दरम्यान, विकी-कॅटरिनाच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे… (Katrina Kaif pregnancy news)

दरम्यान, २०२१ मध्ये विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांमी लग्नगाठ बांधली होती… आणि आता ४ वर्षांनी दोघांना पुत्ररच्न प्राप्त झालं आहे… तसेच, लवकरच विकी कौशल संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अॅंड वॉर’ आणि अमर कौशिक यांच्या ‘महावतार’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे… तर, कॅटरिना कैफ ‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटात शेवटची झळकली होती… आता बाळ झाल्यानंतर पुन्हा ती फिल्म इंडस्ट्रीत पुनरागमन करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Vicky Kaushal दारु आणि मांसाहार सोडणार?
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi