Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Chhaava विकी कौशलने सोडले ‘छावा’मधील विवादित लेझीमच्या सीनवर मौन
विकी कौशल हा त्याच्या लवकरच प्रदर्शित होत असणाऱ्या ‘छावा‘ (Chhaava) या सिनेमामुळे कामलीचा प्रकाशझोतात आला हे. छत्रपती संभाजी महाराजही शौर्यगाथा सांगणारा हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा छावा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या सिनेमाबद्दल सगळ्यांच्याच मनात कमालीची उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अतिशय भव्य असलेला हा ट्रेलर सगळ्यांनाच आवडला. (Chhaava )
कलाकारांचा जिवंत अभिनय, तगडे कलाकार, दमदार संवाद आदी अनके गोष्टींमुळे हा ट्रेलर सगळीकडे गाजत होता. मात्र याचवेळी या ट्रेलरमधल्या एका दृश्यावर आक्षेप घेतला गेला आणि सिनेमा वादात अडकला. सिनेमामध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये एक सीन होता ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना लेझीम खेळताना दाखवले गेले होते. यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल एका दृश्यामध्ये लेझीम नृत्य करताना दिसला आणि यावर अनेकांनी आक्षेप घेतल्यामुळे सिनेमा वादात अडकला होता. (Chhaava Movie Controversy)
आता या वादावर अभिनेता विकी कौशल याने नुकतेच त्याचे मत मांडले आहे. विकी कौशलने सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी बोलताना ‘दृश्य योग्य नसे, तर ते काढून टाकण्यास काहीच हरकत नाही’ असे म्हटले आहे. विकीने या वादावर बोलताना म्हटले की, “छावा सिनेमातील लेझीम नृत्याचे दृश्य हे केवळ २० ते ३० सेकंदांचेच होते. हे नृत्य कथेचा एक भाग नव्हता मात्र तो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जागतिक पातळीवर नेण्याचा एक प्रयत्न देखील होता.”

यावर बोलताना विकी पुढे म्हणाला “माझ्या मते संभाजी महाराज हे जनतेचे राजा होते आणि जर कोणी त्यांना लेझीम खेळण्याची विनंती केली तर ते ते स्वीकारत असतीलच. मात्र जर त्यांच्या अनुयायांना वाटत असेल की ते दृश्य योग्य नव्हते, तर ते काढून टाकण्यास काहीच हरकत नाही. आमच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा आणि संपूर्ण टीमचा कधीही कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.” (Entertainment mix masala)
याविषयी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांचे मत मांडताना म्हणाले, “‘छावा’ सिनेमा आम्ही ‘छावा’ या कादंबरीवर आधारित बनवला आहे. ‘छावा’ या कादंबरीत लिहिले की छत्रपती संभाजी महाराज हे होळी उत्सव साजरा करायचे, होळीच्या आगीतून नारळ खेचून घ्यायचे. लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे. त्यात गैर काहीच नाही. जेव्हा महाराजांनी बुरहानपुरवर हल्ला करून ते बुरहानपूर जिंकून रायगडावर परतले तेव्हा एक वीस वर्षांचा राजा लेझीम खेळलाही असेल. त्यात गैर काय, असे मला वाटते. पण जर लोकांच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा आणि महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे आम्ही तो नक्की काढून टाकू.” (Bollywood Masala)
========
हे देखील वाचा : Chhaava छावा सिनेमातील ‘आया रे तुफान’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतर क्षितीज पटवर्धनची प्रतिक्रिया
========
दरम्यान ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलसोबतच रश्मिका मंदाना अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, डायना पेंटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीचे रूपांतर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून, १४ फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. (Latest Movie News)