रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं वेधलं लक्ष
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा मराठीतील पहिला बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येणार असून १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या भूमिकेतील रितेशचा पहिला लूक रिलीज करण्यात आला. डोळ्यांत अंगार, हातात भवानी मातेच्या आशिर्वादाची तलवार आणि हातात भगवा झेंडा घेतलेले शिवराय पाहून अंगावर काटाच आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेशला पाहून चाहते आणि कलाकार मंडळी त्याचं कौतुक करतात असताना आता त्याच्या या पोस्टवरील विकी कौशलची कमेंट विशेष चर्चेत आहे. नेमकं काय म्हणाला विकी आहे पाहूयात… (Vicky Kaushal)
अभिनेता विकी कौशल याने राजा शिवाजी चित्रपटाला शुभेच्छा देत रितेशच्या शिवरायांच्या भूमिकेतील चित्रपटाच्या पोस्टवर आदराने “आबासाहेब…” अशी कमेंट केली आहे. विकीच्या या कमेंटची प्रचंड चर्चा रंगली आहे. विकी कौशलने अशी कमेंट करत रितेशला मानाचा मुजरा दिला आहे. ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून ‘शंभूराजेंनी शिवरायांना दिलेली ही साद’ असल्याचे म्हटले जात आहे. (Riteish Deshmukh Raja Shivaji Movie)

२०२५ मध्ये लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारली होती. आणि ही भूमिका तो खरंच जगला होता आणि अजूनही तो त्यातून बाहेर आळा नाहीये हे त्याच्या या कमेंटमधून सिद्ध होतंय. (Entertainment News)

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठीसह हिंदी कलाकारांची फौज आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा या भाषेतही रिलीज होणार आहे. रितेशसह या चित्रपटात जिनिलीया देशमुख, जितेंद्र जोशी, सलमान खान, भाग्यश्री, संजय दत्त, फरदीन खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. (Raja Shivaji 2026)
================================
हे देखील वाचा : Raja Shivaji ३०० कोटी कमावणार…!
================================
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जितक्या वेगवेगळ्या माध्यमांतून सांगावा तितकाच कमी. त्यामुळे छत्रपतींच्या जीवनावरील आणखी एका भव्य ऐतिहासिकपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा आरामात पार करु शकेल असा अंदाज बांधला जात आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi