
रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 मध्ये विकी कौशलची एन्ट्री?
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची क्रेझ जवळपास दीड महिना उलटून गेला असला तरी अजून कमी झाली नाही आहे. देशात तर ८५० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पार केला आहेच, शिवाय जगभरातही हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. पहिल्या भागाने प्रेक्षकांना इतकं वेड लावलं आहे की, चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्चला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ मध्ये विकी कौशलची (Vicky Kaushal) एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.
तर, मिड डेने दिलेल्या रिपोर्टनुसार आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ मध्ये विकी कौशल कॅमिओ करणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, यात तो मेजर विहान शेरगिल ही भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता रणवीर सिंग याच्यासोबत पहिल्यांदाच विकी एकत्र स्क्रिन शेअर करणार असून हे दोन तगडे कलाकार काय धमाल करणार हे पाहण्यासाठी आता उस्तुकता अधिक शिगेला पोहोचली आहे. शिवाय, दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. (Bollywood)

रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जून रामपाल यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या छप्पर फाड ‘धुरंधर’ चित्रपटात आता विकी कौशलची एन्ट्री अधिक धमाकेदार ठरणार आहे. तसेच, जरी धुरंधर १ मध्ये अक्षय खन्नाचा मृत्यू झाला असला तरी ‘धुरंधर २’ मध्ये अक्षय खन्ना काही फ्लॅशबॅक सीन्समध्ये दिसणार असं देखील सांगितलं जात आहे. (Akshaye Khanna)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं ?
================================
शिवाय, हमला अली मजारी हे रणवीर सिंगचं खरं नाव नसून ल्यारीमध्ये भारतीय स्पाय म्हणून काम करत असतो आणि त्याचं खरं नाव असतं जसकिरत सिंग रंगी. हे नाव आदित्य धर यांच्या URI : The Surgical Strike चित्रपटातील एका शहीद जवानाचं असतं. त्यामुळे आता याचं काही कनेक्शन असणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, ‘धुरंधर’ने भारतात आत्तापर्यंत ८३०.५ कोटी आणि जगभरात १२९०.३ कोटी कमावले आहेत. तसेच, बॉलिवूडमध्ये ८५० कोटींचा टप्पा पार करत ‘धुरंधर’ने हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून बहुमान मिळवला आहे. (Dhurandhar Box Office Collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi