‘छावा’च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक, छत्रपती संभाजी महाराजांचा लूक करतोय सगळ्यांना प्रभावित
बॉलिवूडमधील सर्वात दमदार अभिनेत्यांपैकी एक असलेला विकी कौशल सध्या ‘छावा : द ग्रेट वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमासाठी जोरदार काम करत आहे. या चित्रपटासाठी त्याने आपला संपूर्ण लूक बदलला असून या चित्रपटाच्या लूकला न्याय देण्यासाठी त्याची वाढलेली दाढी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, उरी अभिनेत्याच्या सेटवरून काही फोटो लीक झाले आहेत ज्यात तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत खूप चांगला आहे आणि त्याचा हा फोटो पाहून चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करत आहेत आणि त्याच्या मेहनतीचे कौतुक ही करत आहेत. (Vicky Kaushal Look As Chhatrapati Sambhaji Maharaj)
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘छावा‘ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या पीरियड ड्रामा चित्रपटात विक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेता या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे आणि त्यासाठी त्याने आपला संपूर्ण लूक बदलला आहे, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये विक्कीने स्लीव्हलेस कुर्ता आणि धोतर परिधान केलेले दिसत आहे.
विकीच्या सेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये त्याचे लांब केस आणि दाढी, कपाळावर टिळक, गळ्यात हार आहे. कपाळावर त्रिपुंड घालून गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेली ही दिसत आहे. विकी कौशलच्या या दमदार स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे फोटो एका जंगलात चित्रीकरणादरम्यान घेण्यात आले होते. या चित्रपटासाठी तिरंदाजी, घोडेस्वारी आणि तलवारबाजी व्यतिरिक्त अभिनेता विशेष भाषेचे प्रशिक्षणही घेत आहे.(Vicky Kaushal Look As Chhatrapati Sambhaji Maharaj)
================================
================================
या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मराठी पुस्तकातून घेण्यात आली आहे, ज्यात संभाजीराजांच्या कारकीर्दीतील घटना आणि कर्तृत्वाचे वर्णन आहे. मराठा साम्राज्याचे वैभव आणि शौर्य, तसेच संभाजीसमोरील वैयक्तिक आणि राजकीय आव्हाने या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे.