Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Vidya Balan हिला २० वर्षांपूर्वी दिग्दर्शकाकडून नाकाची सर्जरी करण्याचा मिळालेला सल्ला, पण…
बॉलिवूडची आत्ताची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिला तिच्या अभिनयाची सुरूवात करून ३० वर्ष पूर्ण झाली…. १९९५ मध्ये ‘हम पाच’ या कॉमेडी लोकप्रिय मालिकेतून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती… एकीकडे मालिकाविश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या विद्या हिने २००३ मध्ये ‘भालो थेको’ या ‘बंगाली चित्रपटातून मोठ्या पडद्यावर सुरुवात केली होती… त्यानंतर २००५ मध्ये ‘परिणीता’ (Parineeta Movie) या क्लासिक रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बंगाली चित्रपटातून जरी विद्याने सुरुवात केली असली तरी इंडस्ट्रीत ‘परिणीता’मुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.

संजय दत्त आणि सैफ अली खान यांच्यासोबत ‘परिणीता’ चित्रपटात विद्या बालन झळकली होती… विशेष म्हणजे २५ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तेव्हा तिप्पट कमाई केली होती… आता लवकरच ‘परिणीता’ हा चित्रपट 8K मध्ये मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे. २९ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना पाहता येणार आहे… हा चित्रपट शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते आणि निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली होती. (Bollywood News)

दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत विद्या बालन हिने निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी तिला चित्रपटासाठी नाकाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता तो किस्सा सांगितला… ती म्हणाली की, ”त्यांनी मला सांगितले, ‘तुझे नाक लांब आहे, ते नीट कर.’ पण मी नकार दिला. मी कधीही माझ्या चेहऱ्यावर कोणतेही बदल केले नाहीत, मी फक्त फेशियल करते. मी जशी आहे तशी स्वतःवर विश्वास ठेवते.” दरम्यान, विद्या बालन हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘भूल भुलैय्या ३’ (Bhool Bhulaiya 3) मध्ये ती झळकली होती… या व्यतिरिक्त ‘शेरनी’, ‘सुलु’, ‘कहाणी’, ‘मिशन मंगल’, ‘पा’, ‘हे बेबी’ अशा बऱ्याच चित्रपटात तिने उल्लेखनीय कामं केली आहे…
================================
हे देखील वाचा : Avatar – Fire and Ash : २१०० कोटींच्या अवतार चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज
=================================
तर, ‘परिणीता’ चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, ही कथा १९६० च्या दशकातील कोलकात्यात घडते. विद्या ललिता नावाच्या एका अनाथ मुलीची भूमिका साकारते जी तिच्या मामाच्या घरी वाढते. तिचा बालपणीचा मित्र शेखर (सैफ अली खान) सोबतचे तिचे नाते खूपच गुंतागुंतीचे आहे. हा चित्रपट प्रेम, सामाजिक भेदभाव आणि स्वाभिमान यासारख्या विषयांना स्पर्श करतो.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi