Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Vidya Balan : “त्या व्हिडिओंपासून सावध राहा”, विद्याचं आवाहन
सेलिब्रिटी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न लाईमलाईटमध्ये अधिकच येऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याच्या राहत्य घरी त्याच्यावर झालेला हल्ला ताजा असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटीसोबत चुकीची घटना घडलीये. कलाकारांचे अकाऊंट हॅक करणे किंवा त्यांचे फेक व्हिडिओ करणे ही प्रकरणं दिवसागणिक वाढू लागली असून आता अभिनेत्री विद्या बालन याची शिकार झाली आहे. बऱ्यावेळा कलाकारांचे फोटो त्यांना माहित नसलेल्या जाहिरातींच्या पोस्टर्सवर वापरले जातात आणि असाच काहीसा गैरप्रकार विद्याच्या बाबतीत झाला असून तिने स्वत: याची माहिती सोशल मिडियावर दिली आहे. (Vidya Balan)

विद्या बालनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, “नमस्कार, मी तुमची आवडती विद्या बालन. आज मी तुम्हाला…”, असं दिसतंय. त्यावर लाल रंगांनी क्रॉस करुन‘स्कॅम अलर्ट’, असं लिहिलंय. पण हा AI Generated खोटा व्हिडीओ असून त्याबद्दल विद्या बालनने लोकांना सावध राहण्याचा इशारा देत लिहिलं आहे की, “सध्या सोशल मीडियावर व व्हॉट्सअपवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मी दिसत आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, हे व्हिडीओ एआय निर्मित आणि अनधिकृत आहेत. माझा या व्हिडीओंशी काहीही संबंध नाही. या व्हिडीओंच्या प्रसारात माझा काहीही सहभाग नाहीये. या कंटेटला मी (Vidya Balan) समर्थन देत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की, हे व्हिडीओ शेअर करण्याआधी त्यामध्ये असलेल्या माहितीची पडताळणी करा. तसेच एआयने निर्माण केलेल्या दिशाभूल करणाऱ्या या व्हिडीओंपासून सावध राहा”, असे म्हणत अभिनेत्रीने सोशल मीडियावरील काही व्हिडीओंमध्ये ती दिसत असून, ते एआयने बनवले गेले आहेत, त्यापासून सावध राहा”. (Cyber crime)
======
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
======
यापूर्वी अभिनेत्री Rashmika Mandana) चा देखील डिप फेक व्हिडिओ तयार केला गेला होता आणि त्याबद्दल सोशल मिडियावर तिने माहिती देखील दिली होती. यावर कलाकारांची चिंता व्यक्त करत लवकरात लवकर अशा सायबर क्राईम्सवर कंट्रोल आला पाहिजे अशी मागणी केली होती. डिपफेक व्हिडिओंच्या जंजाळात रणवीर सिंग, आमिर खान, पंकज त्रिपाठी देखील अडकले होते. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने अशा गैर कृत्यांवर आळा घालून सायबर सिक्युरिटी कडक करण्यत यावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जात आहे. (Celebrity Deepfake Videos)