Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात पद्मश्री मिळवणारी ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका!

 Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात पद्मश्री मिळवणारी ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका!
मिक्स मसाला

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात पद्मश्री मिळवणारी ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका!

by रसिका शिंदे-पॉल 17/12/2025

मराठी चित्रपटसृष्टीतला बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी त्यांच्या सोशल मिडिय़ावरुन दिली आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपट असूनही यात मराठीसह हिंदीतील मातब्बर कलाकारमंडळी महत्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन, संजय दत्त पाठोपाठ आता राजा शिवाजी चित्रपटात आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ती जाणून घेऊयात… (Marathi Movies 2026)

तर, रितेश देशमुख यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत १०० दिवसांची मेहनत पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. आहे. रितेश यांनी ‘राजा शिवाजी’चं शूटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली अशून यामध्ये अभिनेत्याने स्टारकास्टच्या यादीत विद्या बालन (Vidya Balan) हिलासुद्धा टॅग केलं आहे. दरम्यान, या भव्य ऐतिहासिक चित्रपटात विद्या बडी बेगमची भूमिका साकारणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विद्या बालनला तिच्या पहिल्या ऐतिहासिक चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आता जाणून घेऊयात रितेश यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे. “क्षणभर थांबलेला सूर्य.. मावळतीचा मावळ.. पण क्षणभरासाठीच… उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी” १०० दिवसांची मेहनत, निष्ठा, समर्पण आणि अपार जिद्द यावर अखेर पडदा पडला. असंख्य आठवणी, असंख्य अनुभव, आणि मनात कायम राहणारे क्षण. महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन घेऊन लवकरच येत आहोत!!!”, अशा सुंदर शब्दांत त्यांनी पोस्ट केली आहे. त्यामुळे प्रेक्षक ‘राजा शिवाजी’ चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने १ मे २०२६ ची वाट पाहात आहेत. (Riteish Deshmukh Social Media Post)

================================

हे देखील वाचा : जीवा महाला-सलमान खान, अफझल खान-संजय दत्त; Riteish Deshmukhचा ‘राजा शिवाजी’ चालणार का?

================================

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. आणि आताs या यादीत विद्या बालनचं नाव जोडलं गेल आहे. खर तर दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून रितेश यांचाही हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असून सलमान खान (Salman Khan), महेश मांजरेकर वगळता इतर प्रत्येकाचा हा पहिलाच ऐतिहासिकपट आहे. त्यामुळे प्रत्येकाचं काम आणि पहिल्यांदाच हा भव्य मराठी चित्रपट तो ही छत्रपती शिवाजी महाराजांवर असल्यामुळे पाहण्याची उस्तुकता शिगेला पोहोचली आहे. अजय-अतुल यांचं संगीत असणारा हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा ६ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (Raja Shivaji Movie)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bhagyashree bollywood update chhatrapati shivaji maharaj Entertainment genelia deshmukh mahesh manjrekar marathi historical film Riteish Deshmukh salman khan sanjay dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.