
Actor Vijay Deverakonda रुग्णालयात दाखल; ‘किंगडम’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिनेत्याला ‘या’ आजाराने ग्रासलं !
साउथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आगामी थरारपट ‘किंगडम’मुळे चर्चेत आहे. मात्र या चित्रपटाच्या तयारीदरम्यान त्याच्या प्रकृतीसंबंधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडाला डेंग्यू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्या ते डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत. एका प्रसिद्ध मीडिया हँडलने दिलेल्या माहितीनुसार, विजय काही दिवसांपासून ताप आणि प्रचंड अशक्तपणाने त्रस्त होता. प्रारंभी त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण प्रकृती अधिक बिघडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. आता उपचारादरम्यानच त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, २० जुलैपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, मात्र त्यासाठी प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होणे आवश्यक आहे.(Vijay Deverakonda hospitalized)

या संपूर्ण घटनाक्रमाविषयी अद्याप विजय देवरकोंडा किंवा त्यांच्या टीमकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. त्यांच्या चाहत्यांना सध्या त्याच्या आरोग्याची चिंता सतावत असून, सोशल मीडियावरून सतत त्यांच्या प्रकृतीच्या अपडेट्स साठी विचारलं जात आहे. विशेष म्हणजे, विजय सध्या ‘किंगडम’ या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अनुपस्थितीची चाहत्यांना खंत वाटत होती. आता त्यांच्या तब्येतीमुळेच ते कार्यक्रम टाळत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘किंगडम’ हा एक अॅक्शन-थ्रिलर गुप्तहेरपट असून दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला आहे. या सिनेमात विजयसोबत भाग्यश्री बोरसे आणि सत्यदेव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मूळतः हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता तो ३१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Vijay Deverakonda hospitalized)
===============================
===============================
याशिवाय, विजय देवरकोंडा बॉलिवूडच्या ‘डॉन 3’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चाही जोरात आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत त्याचा थरारक सामना होणार असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विजय देवरकोंडा याला जितकं मोठं स्टारडम मिळालं आहे, तितकाच त्यांचा चाहतावर्गही भावनिक आणि एकनिष्ठ आहे. त्यांच्या तब्येतीबद्दलच्या या बातमीने सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वांना त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हीच आशा केली आहे.