यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna वरच्या प्रेमाची कबुली?
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा (Rashmika Mandanna & Vijay Devarkonda) या रिलेशनशिपबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती… मात्र, काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजय यांचा साखरपूडा झाला असं समोर आलं होतं… आता त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कबूली दिली नसली तरी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे त्यावर शिक्का लागला आहे… लवकरच, रश्मिका आणि विजय लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु असताना त्यांच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे…(Entertainment News)

रश्मिका आणि विजय यांचा एक व्हिडिओ सध्या लोकप्रिय झाला आहे… या व्हिडिओवरून मात्र त्यांनी नात्याबद्दल हिंट दिल्याचं म्हटलं जात आहे… हा गोड व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी देखील लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.नुकत्याच झालेल्या एका पार्टीत विजयने रश्मिकाचा हात धरून सर्वांसमोर तिच्या हातावर चुंबन दिलं…
================================
================================
रश्मिकानं तिच्या ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काहीअंशी त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांना दुजोरा दिला होता… आणि आता विजयनं रश्मिकाच्या हातावर किस केल्याच्या व्हिडिओमुळे हे आता फिक्स झालं आहे… रश्मिका आणि विजय यांचा हा व्हिडिओ ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतला असून विजयने मीडिया आणि उपस्थित लोकांसमोर रश्मिका मंदानाचा हात पकडून तिच्या हाताचं चुंबन घेतले…. दरम्यान, रश्मिका मंदाना हिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुष्पा ३’, ‘अॅनिमल पार्क’, ‘कॉकटेल २’ मध्ये ती दिसणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi