महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
विजय पाटकर आणि सुरेखा कुडची दिसणार रोमॅण्टीक अंदाजात…
हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आपल्याला आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे यात काही शंका नाही. ट्रान्सइंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शिरीष राणे यांचे तर निर्मिती राजेंद्र राजन यांची आहे. १३ ऑक्टोबरला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Vijay Patkar & Surekha Kudachi)
या सिनेमात विजय पाटकर यांनी प्रोफेसर पाटकर तर सुरेखा कुडची यांनी प्रोफेसर मेरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय केल्याचं हे दोघे सांगतात. मैत्री आणि प्रेम या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट असणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात सध्या झी मराठी वाहीनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतून गाजत असलेला अभिनेता कश्यप परुळेकर, वीणा जगताप, स्मिता गोंदकर, चिराग पाटील, प्रदीप वेलणकर, स्मिता जयकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग हे कलाकार दिसणार आहेत.(Vijay Patkar & Surekha Kudachi)
==========================
हे देखील वाचा: ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेतील गौरी म्हणजे सीमा कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज…
==========================
‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी यांनी केले असुन संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. तसेच कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. त्याबरोबर सोनाली-उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा, इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत.१३ ऑक्टोबरला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.