Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

विजय पाटकर  आणि  सुरेखा  कुडची दिसणार रोमॅण्टीक अंदाजात…

 विजय पाटकर  आणि  सुरेखा  कुडची दिसणार रोमॅण्टीक अंदाजात…
kalakruti-vijay-patkar-and-surekha-kudchi-will-be-seen-in-a-romantic-avatar-marathi-info/
मिक्स मसाला

विजय पाटकर  आणि  सुरेखा  कुडची दिसणार रोमॅण्टीक अंदाजात…

by Team KalakrutiMedia 02/10/2023

हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने  प्रेक्षकांना खळखळून  हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या  भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आपल्याला आगामी ‘दिल  दोस्ती दिवानगी’ या  चित्रपटात पहायला  मिळणार आहे. या  दोघांची एकत्र काम करण्याची  ही पहिलीच वेळ असणार आहे. चित्रपटात  त्यांचा  रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं?  याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे यात काही शंका नाही. ट्रान्सइंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शिरीष राणे यांचे तर निर्मिती राजेंद्र राजन यांची आहे. १३ ऑक्टोबरला  ‘दिल  दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Vijay Patkar & Surekha Kudachi)

Vijay Patkar & Surekha Kudachi
Vijay Patkar & Surekha Kudachi

या सिनेमात विजय पाटकर यांनी प्रोफेसर पाटकर तर  सुरेखा कुडची यांनी प्रोफेसर मेरी ही व्यक्तिरेखा  साकारली आहे. ‘दिल दोस्ती दिवानगी’ या  चित्रपटाच्या  निमित्ताने आम्ही  पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं  तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे  आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय  केल्याचं  हे दोघे सांगतात. मैत्री आणि प्रेम या  प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट असणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात सध्या झी मराठी वाहीनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतून गाजत असलेला अभिनेता कश्यप परुळेकर, वीणा जगताप, स्मिता गोंदकर, चिराग पाटील, प्रदीप वेलणकर, स्मिता जयकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग हे कलाकार दिसणार आहेत.(Vijay Patkar & Surekha Kudachi)

==========================

हे देखील वाचा: ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेतील गौरी म्हणजे सीमा कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज…

==========================

‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी यांनी केले असुन संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. तसेच कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते,  वैशाली सामंत, सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. त्याबरोबर सोनाली-उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा, इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत.१३ ऑक्टोबरला  ‘दिल  दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity News dil dosti deevangi Entertainment Marathi Movie Surekha kudachi vijay patkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.