हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati ने जिंकलं महाराष्ट्राचं मन!
सिनेमाला भाषेचं बंधन नसतं हे वारंवार प्रत्येक कलाकार त्यांच्या कामांमधून सिद्ध करताना दिसत आहेत. बरेच मराठी कलाकार बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवरही आपली पकड मजबूत करताना दिसत असून काही साऊथ कलाकार बॉलिवूड आणि मराठीतही आपला ऑडियन्स तयार करण्यात्या तयारीत आहेत. बरं तुम्हाला माहित आहे की चित्रपटसृष्टीची सुरुवात मुकपटाने झाली होती आणि आता ‘गांधी टॉक्स’च्या (Gandhi Talks Movie) निमित्ताने २१व्या शतकात एकही संवाद नसणारा चित्रपट एका मराठी दिग्दर्शकानेच आपल्या भेटीला आणला आहे… आणि यात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीने लीड रोल केला असून त्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणालाय विजय ते जाणून घेऊयात… (Marathi Movies 2026)

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीने ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याविषयी असं म्हटलं की, ‘मी सिद्धार्थसोबत याबद्दल बोललो, त्याने नाटकाबद्दल सांगितलं. मी जेव्हा सिद्धार्थ जाधव आणि किशोर यांच्यासोबत बोललो तेव्हा मला कळलं की, त्यांचं मराठी इंडस्ट्रीवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या कामातून हे प्रेम कायम दिसून येतं. मराठी इंडस्ट्रीने बिग प्रोजेक्ट्स तयार करायला हवे. मलासुद्धा मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. मी जेव्हा यांच्याबरोबर काम करत होतो, तेव्हा मी यांना मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली.’ (Siddharth Jadhav and Vijay Sethupati)

पुढे मराठी चित्रपटांबद्दल बोलताना विजय असं देखील म्हणाला की, “मराठीत आणखी मोठमोठे सिनेमे बनले पाहिजेत आणि मलाही मराठी इंडस्ट्रीत काम करायचं आहे. मी त्यांना तसं सांगितलं आहे. मी जास्त चित्रपट पाहिले नाहीत त्यामुळे कोण चांगले दिग्दर्शक आहेत ते मला सांगा त्यांच्याकडून मी स्क्रिप्ट ऐकायला नक्कीच तयार आहे. मी मराठी बोलायचाही प्रयत्न करेन.’, विजयने मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करेन या वाक्यावर त्याने महाराष्ट्राचं मन नक्कीच जिंकलंय. त्यामुळे मराठीत विजय सेतुपतीला काम करताना पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली यात शंकाच नाही. (Entertainment Trending News)
================================
================================
दरम्यान, किशोर बेलेकर दिग्दर्शित गांधी टॉक्स हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात साऊथ स्टार विजय सेतुपतीसह सिद्धार्थ जाधव, अदिती राव हैदरी, वनिता खरात, उषा नाडकर्णी असे कलाकार झळकले आहेत. तसेच, येत्या काळात ‘पेड्डी’ (Peddi) आणि ‘के.डी : द देविल’ हे नवे चित्रपट विजय आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. (Vijay Sethupati Upcoming Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi