
Sri Sri Ravi Shankar : आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार श्री श्री रविशंकर यांची भूमिका!
हिंदी चित्रपटसृष्टीत एकाच पठडीतील चित्रपट एकामागोमाग येण्याचा ट्रेण्ड अजूनही सुरुच आहे. गेल्या काही काळात लागोपाठ ऐतिहासिक, बायोपिक्स आणि हॉरर कॉमेडी हे चित्रपट येत आहेत. अशातच काही महिन्यांपूर्वी तरुणांना प्रेरणा देणारा ‘१२वी फेल’ (12th fail) हा चित्रपट आला होता. यात विक्रात मेस्सी (vikrant massey) याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. आणि आता लवकरच तो आणखी एका वेगळ्या आणि अनपेक्षित भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. (Entertainment news)
अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच ‘व्हाइट’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्यांच्या कोलंबियातील ५२ वर्षांच्या गृहयुद्धाच्या शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांची कहाणी मांडली जाणार आहे. (International entertainment news)

या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असून, महावीर जैन चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांमध्ये तयार केला जाणार असून हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये डब केला जाणार आहे. जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट सादर केला जाणार असून ऑस्कर पुरस्कार विजेते कलाकार आणि तंत्रज्ञ चित्रपटाच्या टीममध्ये असणार आहेत.(Bollywood movies)

‘व्हाइट’ चित्रपटाची कथा जाहिरात दिग्दर्शक आणि लेखक मोंटो बसी यांनी लिहिली असून, त्यांनी या चित्रपटासाठी त्यांनी चार वर्षे रिसर्च केला आहे. दरम्यान, चित्रपटात श्री श्री रवी शंकर यांची भूमिका साकारणारा विक्रात काही दिवसांपूर्वीत श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravi Shankar) यांना भेटला होता. दरम्यान, ‘व्हाइट’ (White) या चित्रपटाच्या माध्यमातून अहिंसा, प्रेम आणि ‘वन वर्ल्ड, वन फॅमिली’ या संकल्पनेचा प्रचार करण्याचा विचार आहे. करण्यात येणार आहे.(White international movie)
===========================
हे देखील वाचा:Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन
===========================
विक्रांतच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत त्याने ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) , ‘ब्लॅकआऊट’, ‘सेक्टर ३६’ (Sector 36), ‘फॉरेन्सिक’, ‘छपाक’, ‘लूटेरा’ अशा अनेक या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (vikrant massey movies)