Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Vinod Khanna : जेव्हा अमिताभ बच्चन यांचं यश विनोद खन्ना यांच्या डोळ्यांत खुपत होतं….
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन विनोद खन्ना, राजेश खन्ना, अमोल पालेकर, जितेंद्र असे बरेच सुपरस्टार कलाकार आहेत… हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्यांनी उत्कृष्ट चित्रपट त्यांच्या चाहत्यांना दिले आहेत… याच यादीतील एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना (Vinod Khanna)…करिअरच्या पीकवर असताना अचानक ते चित्रपटांपासून दुर गेले आणि थेट ओशोंच्या आश्रमात सेटल झाले… त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अख्खं मार्केट खाऊन टाकलं होतं… आणि त्यांचं यश डोळ्यात खुप असल्याचं त्यांनी सांगितलं.. त्यावेळी ओशो यांनी विनोद खन्ना यांना काय सल्ला दिला होता जाणून घेऊयात…

तर, ओशो यांचे भाऊ स्वामी शैलेंद्र सरस्वती यांनी याविषयी खुलासा करत म्हटलं होतं की, “विनोद खन्ना हे प्रत्यक्षात आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण काढून दुःखी नव्हते, तर त्यांना अमिताभ बच्चन यांच्या अफाट यशाबद्दल मनात असूया वाटत होती. ते बच्चन यांच्या यशावर जळत होते. त्या काळात अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होते आणि जवळपास प्रत्येक मोठ्या चित्रपटात त्यांची निवड होत होती. यामुळे विनोद खन्ना यांना वाटत होते की, आपली जागा आणि संधी अमिताभ यांनी घेतली आहे.”

पुढे त्यांनी म्हटले की,”एकदा त्यांनी ओशोंना सांगितले की, त्यांना घरची खूप आठवण येते. पण ओशोंनी त्यांची खरी वेदना ओळखली आणि सांगितले की, तुला तुझ्या कुटुंबाची नव्हे, तर करिअरमध्ये गमावलेल्या स्थानाची खंत आहे. ओशोंनी त्यांना सुचवले की, जर तुला खरंच अमिताभ बच्चनशी स्पर्धा करायची असेल, तर चित्रपटांपेक्षा राजकारणात उतर. यानंतर खरंच विनोद खन्ना यांनी राजकारणात प्रवेश केला. ते भाजपामध्ये सामील झाले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रीही झाले. दुसरीकडे अमिताभ बच्चन काँग्रेसकडून निवडणूक लढले होते.” असं स्वामी शैलेंद्र सांगितलं होतं.
================================
=================================
दरम्यान, ‘अमर अकबर अॅंथनी’, ‘बटवारा’, ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘हेरा फेरी’, ‘कुवांरा बाप’, ‘जमीर’ अशा काही चित्रपटांमध्ये स्क्रिन शेअर केली होती… याशिवाय, विनोद खन्ना यांनी ‘मस्ताना’, ‘रखवाला’, ‘एलान’, ‘प्यार का रिश्ता’, ‘हाथ की सफाई’, ‘शंकर शंभू’, ‘युवराज’, ‘गरम खुन’, ‘खुदा कसम’, ‘वॉंन्टेड’ अशा बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi