
O Romeo : नाना पाटेकरांनंतर आता शाहिद आणि विशाल यांच्यातही वाद?
नाना पाटेकर (Nana Patekar) कधी काय बोलतील किंवा कधी त्यांचा राग अनावर होईल याचा खरंच कधीच कुणाला नेम नसतो. सध्या ते विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ या चित्रपटात झळकणार असून याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचवेळी कलाकारांना यायला उशीर झाल्यामुळे ते तडकाफडकी निघून गेल्याची घटना घडली. नाना चिडल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे नाना नाराज असताना आता दुसरीकड शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांच्यातही नाराजीनाट्य झाल्याचं सांगितलं जात आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…
तर, ‘कमिने’, ‘हैदर’ आणि ‘रंगून’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर विशाल भारद्वाज (Vishal Bharadwaj) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच, त्यांच्या ‘ओ रोमिओ’ (O Romeo) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. एका स्टेजवर दोघे उपस्थित होते खरे पण काही काळापासून त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, याबद्दल विशाल यांनी यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. विशाल म्हणाले की, “माझ्या दिग्दर्शक मित्रांना वाटतं की, मला आतापर्यंत ९ नॅशनल पुरस्कार मिळाले. आता शाहिद कपूरसोबत चार चित्रपट केल्याबद्दल मला १० वा नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा. पण लोकांना हे माहित नाही की माझ्यासारख्या ‘कठीण’ माणसासोबत काम करणं किती आव्हानात्मक आहे. खरं तर माझ्यासोबत चार चित्रपट केल्याबद्दल शाहिदलाच नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा!” (Bollywood)

पुढे ते असं देखील म्हणाली की, “आमच्यात अनेकदा क्रिएटिव्ह मतभेद होतात आणि आमच्यात भांडणेही होतात. पण मीडियामध्ये या भांडणांची जेवढी चर्चा होते, तेवढी ती मोठी नसतात. आमचं नातं हे लक्ष्मीकांत-प्यारेलाल किंवा कल्याणजी-आनंदजी यांच्यासारखं आहे, जिथे कामाप्रती आदर आणि एकमेकांवरील विश्वास जास्त महत्त्वाचा आहे.” तसेच, नाना पाटेकर रागाने निघून गेले त्याबद्दल विशाल यांनी नाना आपल्या मिश्किल स्वभावाप्रमाणे वागले आणि त्याचं आम्हाला काही नवल वाटलं नाही. (Entrtainment News)
तसेच, यावेळी शाहिद कपूरने विशाल भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवावर भाष्य करताना म्हटलं की, “विशाल सरांसोबत काम करणं म्हणजे एखाद्या थरारक प्रवासासारखं असतं. ‘कमिने’पासून सुरू झालेला हा प्रवास ‘ओ रोमियो’पर्यंत पोहोचला आहे आणि मला त्यांच्या फिल्मोग्राफीचा भाग असल्याचा अभिमान वाटतो.”
================================
हे देखील वाचा : Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”; पाटेकर देवळात का जात नाहीत?
================================
दरम्यान, विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ हा चित्रपट ९० च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्डवर आधारित असून यात शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत तृप्ती डिमरी (Tripti Dimri) झळकणार आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात नाना पाटेकर, फरिदा जलाल आणि विक्रांत मॅसी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. (O Romeo Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi