हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

थाटात संपन्न झाला Vishal Nikam-Akshaya Hindalkar यांचा साखरपुडा!
मराठी बिग बॉसच्या तिसरा सीझनचा विजेता विशाल निकम (Vishal Nikam) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे विशेष चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात बऱ्याचदा त्याने त्याच्या सौंदर्याचा उल्लेख केला होता. आता खऱ्या आयुष्यातील सौंदर्यासोबत त्याने साखरपुडा उरकला असून लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्याशी त्याचा साखरपुडा झाला असून सोशल मिडियावर दोघांनी आपल्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.

थोड्या दिवसांआधी विशालने फोटो शुट करत लवकरच त्याच्या जीवनातील साथीदाराचा चेहरा चाहत्यांसमोर आणणार असल्याचं जाहिर केलं होतं. आणि त्यानुसार त्याने अक्षयासोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. आता विशाल-अक्षयाने (Akshaya Hindalkar) साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आपल्या अकाउंटवरुन फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं…”, असं सुंदर कॅप्शन देत विशालने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.अभिनेत्याचे हे फोटो पाहून मराठी सेलिब्रिटींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

================================
================================
दरम्यान, विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र स्क्रिन शेअर केली होती. आता मालिकेतील ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या जीवनात नव्या प्रवासाची सुरुवात लवकरच करणार आहेत. विशालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर’दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ या मालिकेतून त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. तर, सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Vishal Nikam Engagement)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi