
“वरण-भात माझं आवडीचं जेवण”, ट्रोल झाल्यावर Vivek Agnihotri यांची पलटी
‘द बंगाल फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या त्यांच्या या चित्रपटापेक्षा मराठी पद्धतीच्या जेवणावर त्यांनी केलेल्या विधानमुळे जास्त चर्चेत आहेत… वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण असं वक्तव्य नुकत्याच एका मुलाखतीत अग्निहोत्रींनी केलं होतं… यामुळे सामान्य नागरिकांसह मराठी कलाकारांचा रोष त्यांना पत्करावा लागला होता… आता विवेक यांनी त्यांच्या या विधावर पलटी मारत स्पष्टीकरण दिले आहे… माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असं विवेक यांनी म्हटलं… नेमकं विवेक काय म्हणाले जाणून घेऊयात…

विवेक अग्निहोत्रींनी द रौनक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत विवेक म्हणाले की, “एका ठिकाणी मी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत मी गमतीत म्हणालो की मी जेव्हा दिल्लीहून मुंबईला गेलो होतो. तेव्हा पल्लवी जी महाराष्ट्रीयन आहे तिने मला वरण भात खाऊ घातला. त्यात मीठही कमी होतं. तर मी दिल्ली स्टाइलमध्ये म्हटलं की अरे हे काय मी गरीबांचं खाणं खाऊ? पण, त्यानंतर मी हेही म्हणालो होतो की जसं मला अक्कल आली तेव्हा समजलं की भारतात महाराष्ट्रीयन फूड हे सगळ्यात हेल्दी आहे. जे मी खूप आवडीने खातो. वरण भात माझं आवडतं खाणं आहे”.(Entertainment News) पुढे विवेक म्हणाले की,”आता काही लोकांनी काय केलं की सुरुवातीचं वाक्य उचललं. महाराष्ट्रच्या अन्नाला गरीबांचं खाणं म्हटलं. याला पकडून मारा…त्यामुळे मला कोणत्याच वादात अडकायचं नाही. आजकाल लोक एडिट करतात”.
================================
हे देखील वाचा: “वरण-भात म्हणजे गरीबांचं जेवण”; Vivek Agnihotriच्या विधानावर मराठी कलाकारांचा संताप
=================================
कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी ‘द बंगाल फाईल्स’ (The Bengal Files) या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसले होते… यावेळी मराठी जेवण हे गरीबांचं जेवण आहे असं विवेक म्हणाले होते.. तसेच, “मला वाटलेलं मराठी जेवण म्हणजे मस्त तूप वगैरे घालून असेल. पण, हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब खाणं झालं”.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi