‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

“२०५० मध्ये लोकं म्हणतील कोण शाहरुख खान?”; Vivek Oberoi चं विधान चर्चेत
बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबरॉय याचा आगामी ‘मस्ती ४’ (Masti 4 Movie) चित्रपट रिलीज झाला आहे… पण सध्या तो लाईमलाईटमध्ये त्याच्या कामामुळे नाही तर शाहरुख खान याच्याबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेत आहे… विवेकने नुकताच एक दावा करत असं म्हटलं आहे की, “शाहरुख खान याला पुढच्या २५ वर्षात लोकं विसरुन जातील… वेळ जसजशी पुढे जाते, तसतसे प्रत्येक जण इतिहासाच्या पानांवर फक्त एक ‘फुटनोट’ बनून राहतात”. विवेकने यावेळी एक उदाहरण देत सांगितले की, कधी काळी चित्रपटविश्वात देवासमान मानले जाणारे शो मॅन राज कपूर आजच्या तरुण पिढीला फारसे परिचित नाहीत”. नेमकं विवेक ऑबरॉय काय म्हणाला आहे हे जाणून घेऊयात… (Vivek Oberoi)

‘पिंकविला’शी बोलताना विवेक म्हणाला, “आज तुम्ही कोणालाही ६० च्या दशकातील चित्रपटांविषयी काही विचारलंत, तर बहुतेकांना काहीच ठाऊक नसतं. माणूस इतिहासापुरताच मर्यादित होऊन जातो. कदाचित २०५० मध्ये लोक विचारतील,‘शाहरुख खान कोण?’ यानंतर त्याने पुन्हा एकदा राज कपूर (Raj Kapoor) यांचा संदर्भ घेत त्याने सांगितले की, रणबीर कपूरचे अनेक तरुण फॅन्सला त्याच्या आजोबांबद्दल फारसे माहीतही नसतील. “आज बर्याच जणांना ‘राज कपूर कोण?’ असा प्रश्न पडतो. तुम्ही-आम्ही त्यांना सिनेमाचा देव मानतो, पण आजच्या पिढीतील मुलांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे इतिहास अनेकांना विस्मृतीत ढकलतो,” असेही तो म्हणाला. आता यावर शाहरुख खान काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
================================
हे देखील वाचा : Vivek Oberoi : फराह खानचा असिस्टंट ते १२०० कोटींचा मालक!
================================
हळूहळू इंडस्ट्रीत आपला जम बसवत विवेकने २००२ मध्ये ‘कंपनी’ या चित्रपटातून अभिनयाचा प्रवास सुरु केला… पुढे ‘रोड’, ‘साथिया’, ‘दम’, ‘युवा’, ‘काल’, ‘ओमकारा’, ‘नक्शा’, ‘शुटआऊट अॅट लोखंडवाला’, ‘फुल अॅण्ड फायनल’, ‘मिशन इस्तानबुल’, ‘रक्त चरित्र’,‘क्रिश ३’अशा बऱ्याच चित्रपटात त्याने विविधांगी भूमिरका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… (Vivek Oberoi Movies)
शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्याबद्दल बोलायचं झालं तर नुकताच बॉलिवूडच्या किंग खानचा ६०वा वाढदिवस जोरदार सेलिब्रेट झाला.. ३० वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत काम करणाऱ्या शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला…. लवकरच शाहरुख सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’(King Movie) चित्रपटात दिसणार असून त्याच्यासोबत सुहाना खान, दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, राघव जुयाल, अर्शद वारसी, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi