
Anant-Radhikaच्या लग्नातील पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मिळणार कोट्यवधींची घड्याळ
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला लहान मुलगा अनंतच्या लग्नात कोणतीही कसर सोडताना दिसत नाही आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघे 12 जुलै 2024 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाचे सर्व कार्यक्रम विधी तीन दिवस चालणार असून १४ जुलै रोजी संपणार आहेत. आता लग्नाचे विधी ही सुरू झाले आहेत. नुकताच त्यांचा एक संगीत आणि हळदी सोहळा पार पडला, ज्यात कुटुंबासह अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली. मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी खास तयारी केली असून परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले आहे. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी एक खासगी विमानही तयार करण्यात आलं आहे.(Anant-Radhika Wedding)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, देश आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेल्या मुकेश अंबानी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. इतकंच नाही तर परदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांनाही त्यांनी आमंत्रित केलं आहे. डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड हे या लग्नाची सर्व जबाबदारी सांभाळणार आहे. अनंत आणि राधिका फ्लॅश मॉबसोबत लग्नात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांच्या देखरेखीखाली ते ६० नर्तकांसह सादरीकरण करणार आहेत.

यांच्या लग्नाचे सर्व कपडे मनीष मल्होत्रा यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या स्वदेशच्या कारागिरांच्या सहकार्याने डिझाइन केले आहेत. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नातील जेवणाच्या मेन्यूबद्दल बोलायचे झाले तर यात एक हजाराहून अधिक पदार्थांचा समावेश असेल. १० हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ हे पदार्थ तयार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(Anant-Radhika Wedding)
============================
============================
या शिवाय समोर आलेल्या माहीतीनुसार यांच्या लग्नातील व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास रिटर्न गिफ्ट तयार करण्यात आले असून हे गिफ्ट्स कोट्यवधीरुपयांची घड्याळे आहेत असे ही समोर आले आहे.. अनेक राज्यांतून या रिटर्न भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. ही घड्याळे केवळ व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी असतील आणि उर्वरित पाहुण्यांसाठी राजकोट, काश्मीर आणि बनारस येथून भेटवस्तू तयार करण्यात आल्या आहेत.