वहिदा रहमानने संजीव कुमारला शिकवला चांगलाच धडा!
काही हिरोंना सिनेमाच्या सेटवर उशिरा येण्याची सवय असते ते जाणून करत नसतात पण त्यांना एक सवय अस लागून गेलेली असते. यामध्ये एक ‘एटीट्युड’ असतो. मी हिरो आहे. माझ्यासाठी सगळ्यांनी थांबलं पाहिजे. मी सिनेमाचा प्रमुख कलाकार आहे. ही कुठेतरी अहंकारी स्वामित्वाची भावना त्यामध्ये दडलेली असते. पण बऱ्याचदा शेरास सव्वाशेर मिळतच असतो. असाच काहीसा गमतीशीर प्रकार Sanjeev Kumar (Sanjeev Kumar) यांच्याबाबत झाला होता.
Sanjeev Kumar देखील Rajesh Khanna यांच्याप्रमाणेच सेटवर उशिरा येण्यासाठी खूप (कु)प्रसिद्ध होते. त्यांची ही सवय अनेक निर्मात्यांची डोकेदुखी बनली होती कारण ते उशिरा आल्यामुळे सर्व शेड्युल बिघडायचे आणि खर्च वाढायचा. हिरो असल्यामुळे त्यांना फारसं कुणाला डायरेक्ट बोलता देखील यायचं नाही. पण Sanjeev Kumar (Sanjeev Kumar) ची ही खोड मोडली अभिनेत्री Waheeda Rehman ने. मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. (Untold Stories)
हा किस्सा आहे १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘मनमंदिर’ या चित्रपटाच्या वेळेसचा. या चित्रपटात Sanjeev Kumar, Waheeda Rehman ,Rakesh Roshan आणि Mehmood प्रमुख भूमिकेमध्ये होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक तापी चाणक्य होते. तापी चाणक्य हे दक्षिणेतील गाजलेले दिग्दर्शक. हिंदीत त्यांचा एकाच सिनेमा गाजला ‘राम और श्याम’. या सिनेमाच्या शूटच्या वेळी अभिनेता Sanjeev Kumar (Sanjeev Kumar) ने नेहमीप्रमाणे सेटवर उशिरा यायला सुरुवात केली होती. अभिनेत्री Waheeda Rehman आपल्या कामाच्या बाबत खूपच पर्टिक्युलर असायची. वेळेवर जाणे वेळेवर येणे याची तिला छान सवय लागली होती. पण अभिनेता Sanjeev Kumar च्या या उशिरा येण्यामुळे शूटिंगचे शेड्युल बिघडू लागले आणि सर्वांना त्याचा त्रास होऊ लागला.
दिग्दर्शक देखील नवीन असल्यामुळे ते काही बोलू शकत नव्हते. वहिदा रहमान खरं तर Sanjeev Kumar ला सर्व अर्थाने सिनियर होती; पण याची जाणीव Sanjeev Kumar (Sanjeev Kumar) ला नव्हती. त्याचे सेटवर रोज उशिरा येणे शिस्तप्रिय वहिदा यांना मात्र अजिबात आवडत नव्हते. सेट वरील इतर कलाकार देखील यामुळे त्रस्त झाले होते. वहिदा आणि संजीव यांचा हा पहिलाच सिनेमा होता. (Untold Stories)
काही दिवस तिने वाट पाहिली आणि Sanjeev Kumar ला अद्दल घडवायची ठरवले. त्यांनी दिग्दर्शकाला विश्वासात घेऊन एक प्लान केला. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी Sanjeev Kumar (Sanjeev Kumar) नेहमीप्रमाणे उशिरा सेटवर येत असताना वहिदाने त्याच वेळी रागारागात सेटच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संजीवची गाडी सेटवर येत असतानाच Waheeda Rehman आपल्या गाडीतून निघून गेली. Sanjeev Kumar आणि Waheeda Rehman यांची गाडी परस्परांना क्रॉस झाली. Sanjeev Kumar ला आश्चर्य वाटले.
सर्व प्लान प्रमाणे चालले होते. Waheeda Rehman थेट आपल्या घरी निघून गेल्या. त्या पद्धतीने तसं ठरलंच होतं. सेटवर गेल्यानंतर सर्व जण डोक्याला हात लावून बसले होते. Sanjeev Kumar (Sanjeev Kumar) ने विचारले,”Waheeda Rehman कुठे गेल्या?” एका असिस्टंट डायरेक्टर म्हणाले तुमच्या उशिरा येण्यामुळे Waheeda Rehman प्रचंड नाराज झालेल्या आहेत आणि त्यांनी हा सिनेमा सोडून देण्याची धमकी दिली आहे. म्हणून त्या निघून गेल्या आहेत!” Sanjeev Kumarला खूप वाईट वाटले. (Untold Stories)
आपल्यामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान होत आहे. वहिदा रहमान हा सिनेमा सोडत आहे. त्यामुळे त्यांनी निर्मात्याला सांगितले ,” माझे चुकले मी वहीदाजी ची माफी मागतो! प्लीज त्यांना सेट वर बोलवा.“ निर्मात्याने वहिदा रहमानला फोन लावला Sanjeev Kumar ने (Sanjeev Kumar) फोन हातात घेऊन सांगितलं की,” मला माफ करा. उद्यापासून मी सेटवर वेळेवर येत जाईन. पण प्लीज सिनेमा सोडू नका.” अशा पद्धतीने Sanjeev Kumarची सेटवर उशिरा सेटवर येण्याची खोड मोडली.
================
हे देखील वाचा : नुसरत फतेह अली यांना पाहून आनंद बक्षी यांचे डोळे का पाणावले?
================
दुसऱ्या दिवशीपासून Sanjeev Kumar वेळेवर सेटवर पोहोचू लागला. चित्रपट तयार झाला. प्रदर्शित झाला. आज ‘मनमंदिर’(१९७१) हा चित्रपट कोणाला आठवण्याची सुतराम शक्यता नाही पण यातील ‘जादूगर तेरे नैना दिल जायेगा बचके कहा’ हे गाणे आज देखील स्मरणात आहे. Sanjeev Kumar (Sanjeev Kumar) आणि Waheeda Rehman यांनी नंतर त्रिशूल, नमकीन, सवाल या सिनेमातून एकत्र काम केले पण Waheeda Rehmanने संजीवला शिकवलेला धडा त्याच्या कायम लक्षात राहिला. (Untold Stories)