‘कभी कभी’ चे टायटल सॉंग अमिताभ बच्चन गाणार होते?
यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’ (१९७६) हा चित्रपट एक कल्ट क्लासिक रोमँटिक मुव्ही म्हणून आजदेखील लोकप्रिय आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), शशी कपूर, राखी, वहिदा रहमान, ऋषी कपूर, नीतू सिंग या बड्या स्टार्सना घेऊन यश चोप्रा यांनी हा चित्रपट बनवला. साहीर लुधियानवी यांची अर्थपूर्ण गाणी आणि खय्याम यांचे मधुर संगीत यामुळे चित्रपट आजदेखील रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. या चित्रपटातील एका गाजलेल्या गाण्याचा किस्सा आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. (Amitabh Bacchan)
‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है…’ हे या चित्रपटातील टायटल साँग मुकेश आणि लता यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे ठरले होते. त्या पद्धतीने या गाण्याच्या काही रिहर्सल्स देखील झाल्या. पण रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशीच मुकेश यांची प्रकृती जाम बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. डॉक्टरांनी त्यांना कुठल्याही प्रकारचे काम करायला बंदी घालून सक्त विश्रांती घ्यायला सांगितली. इकडे यश चोप्रा मुकेश यांच्या प्रकृती सुधारण्याची वाट पाहत होते पण त्यात फारसा काही सुधार होत नव्हता. (Amitabh Bacchan)
शेवटी त्यांनी हे टायटल साँग अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे ठरवले. या चित्रपटात अमिताभच्या (Amitabh Bacchan) आवाजात एक ‘कभी कभी’ नावाची एक नज्म रेकॉर्ड केलेली होतीच. या चित्रपटात अमिताभची भूमिका एका कवीची असल्यामुळे हे गाणे देखील अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या आवाजातच रेकॉर्ड करण्याचे यश चोप्रा यांनी ठरवले.
एक दिवस यश चोप्रा मुकेश यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. तेव्हा मुकेश यांनी चोप्रांना विचारले,” मी असे ऐकले आहे की ‘कभी कभी’ या चित्रपटातील शीर्षकगीत तुम्ही अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या आवाजात रेकॉर्ड करणार आहात?” त्यावर यश चोप्रा म्हणाले, “अजून रेकॉर्ड केलेले नाही. पण तसा विचार आम्ही करत आहोत.” त्यावर मुकेश यांनी यश चोप्रा यांचा हात धरला. डोळ्यात पाणी आणून म्हणाले, “चोप्राजी असे करू नका हो. हे माझे अतिशय आवडते गाणे आहे. ते तुम्ही माझ्याच आवाजात रेकॉर्ड करा. या गाण्यावर मी गेल्या वीस वर्षापासून प्रेम करतो आहे. ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाच्या वेळी साहीर साहेबांनी मला हे गाणे ऐकवले होते. तेव्हापासून हे गाणे माझ्या अत्यंत आवडीचे आहे. तेंव्हा कृपया तुम्ही हे गाणे माझ्या आवाजातच रेकॉर्ड करा.” यश चोप्रा फक्त ‘हूं’ म्हणाले. त्यावर मुकेश पुन्हा म्हणाले, “यश जी भले तुम्ही चित्रपटात हे गाणे अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bacchan) आवाजात रेकॉर्ड करा. पण या सिनेमाच्या ज्या रेकॉर्ड्स येतील त्यावर मात्र माझ्या आवाजातच हे गाणे असू द्या. प्लीज.” डबडबल्या डोळ्यांनी मुकेश बोलत होते. एका कलावंताचं आपल्या संगीतावर किती प्रेम असू शकतं हे चोप्राजींच्या लक्षात आलं.
या गाण्याचा इंतजार मुकेश केली वीस वर्ष करत होते हे देखील त्यांच्या लक्षात आलं. त्यावर त्यांनी मनातल्या मनात निर्णय घेतला आणि ते मुकेश यांना म्हणाले, “मुकेशजी, तुमची तब्येत बरी होऊ द्या. मी हे गाणे दुसऱ्या कुणाच्याही आवाजात रेकॉर्ड करत नाही. आता हे गाणे फक्त आणि फक्त तुमचे आहे आणि ते तुमच्याच आवाजात रेकॉर्ड होईल. याची खात्री बाळगा. आधी तुमची तब्येत चांगली करा!” मुकेश खूप आनंदी झाले. काही दिवसात त्यांची प्रकृती सुधारली आणि हे गाणे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले सोबतीला लताचा स्वर होता ! (Amitabh Bacchan)
==================
हे देखील वाचा : ‘कस्मे वादे निभायेंगे हम…’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट गोष्ट !
==================
‘कभी कभी ‘ चित्रपटातील शीर्षकगीत जर अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी गायले असते तर ते त्यांचे पहिले गीत ठरले असते. लतासोबत ते पहिल्यांदा ‘सिलसिला’ या सिनेमात ‘ये कहां आ गये हम’ गायले. या सिनेमाचे दिग्दर्शक यश चोप्रा होते तर संगीत शिव हरी यांचे होते. गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले होते. अमिताभचे (Amitabh Bacchan) पहिले सोलो गीत ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो’ हे १९७८ सालच्या ‘मि. नटवरलाल’ या सिनेमात होते ज्याला राजेश रोशन यांचे संगीत होते.