‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सत्यजित रे ‘हा’ चित्रपट काढताना कन्फ्युज होते ?
भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणारे सत्यजित रे यांनी १९७७ साली एक हिंदी चित्रपट बनवला होता ‘शतरंज के खिलाडी’. रे यांनी बनवलेला तो एकमेव हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सद्गती’ नावाची एक हिंदी भाषेत शॉर्ट फिल्म बनवली होती पण ‘शतरंज के खिलाडी’ हा पूर्ण लांबीचा हिंदी सिनेमा होता. ख्यातनाम हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या कथानकावर हा चित्रपट होता. या सिनेमाची पार्श्वभूमी १८५७ च्या राष्ट्रीय संग्रामाची होती. हिंदुस्थानातील अखेरचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर याच्या कर्मभूमीत ही कहाणी घडते. कथेचा प्लॉट जबरदस्त होता. (Satyajit Ray)
सत्यचित्रे यांना ही कथा प्रचंड आवडली होती. या कथेवर एक चांगला सिनेमा निर्माण होऊ शकतो असं त्यांना वाटत होतं. खूप चांगलं पोटेन्शिअल या स्टोरीमध्ये आहे असं त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी या कथेवर चित्रपट काढायचे ठरवलं तो देखील हिंदी भाषेत परंतु त्यांना हिम्मत होत नव्हती. सत्यजित रे यांची पत्नी बिजया रॉय यांनी आपल्या पुस्तकात ‘माणिक अँड आय : माय लाईफ विथ सत्यजित रे (Satyajit Ray)’ मध्ये असे लिहिले आहे की , सत्यजित रे या सिनेमाबाबत खूप चिंतेत असायचे. हा सिनेमा कसा करावा याबाबत त्यांना काळजी होतीच. बंगालीमध्ये एक सरस चित्रपट देणारे रे या पहिल्या हिंदी सिनेमाच्या वेळी मात्र काहीसे गोंधळले होते.
एकदा त्यांचे आर्ट डायरेक्टर बन्सी चंद्र गुप्ता यांनी रे यांना विचारले “आपल्याला हा सिनेमा करताना नेमकी कशाची अडचण वाटत आहे?” तेव्हा रे म्हणाले ,”कथानक तर चांगले आहे पण मला नेमकं कळत नाही मी सुरुवात कशी करू?” त्यावर बन्सी चंद्र गुप्ता म्हणाले ,”म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे?” त्यावर रे म्हणाले ,”कुठल्याही सिनेमाचा सर्वात स्ट्रॉंग पॉईंट असतो त्याची पटकथा आणि संवाद. आजवर मी माझ्या सर्व बंगाली सिनेमाचे पटकथा आणि संवाद स्वतः लिहिले आहेत. इथे मात्र संवाद मला हिंदीमध्ये लिहायचे आहेत आणि मला स्वतःला तो कॉन्फिडन्स येत नाही. मी हिंदीमध्ये तितका कम्फर्ट नाही. (Satyajit Ray)
मी लिहू शकेल की नाही? त्यामुळे गोंधळलो आहे.” यावर बन्सी चंद्र गुप्ता म्हणाले,” तुम्ही बंगाली भाषेमध्ये निष्णात आहात. तुम्ही शतरंज के खिलाडी या सिनेमाची पटकथा आणि संवाद बंगाली भाषेत लिहून काढा आणि नंतर आपण ते हिंदीमध्ये अनुवादित करून घेऊ. तुम्ही स्वतः बंगाली भाषेमध्ये लिहिले असल्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट असाल. आणि हिंदी भाषा तुम्हाला समजते. बोलता येते. त्यामुळे अनुवादित झालेला मजकूर तुमच्या बंगाली पटकथेची तादात्म्य पावणारा आहे की नाही तुम्हाला लगेच कळेल. तुमच्या पटकथेचा सर्व फ्लेवर हिंदी भाषेत येईल!” सत्यजित रे यांचा चेहरा खुलला. त्यांनी लगेच ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद बंगाली भाषेमध्ये लिहायला सुरुवात केली.
सर्व काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हिंदी आणि उर्दूतील जाणकार साहित्यिक शमा जैदी आणि जावेद सिद्दिकी यांना बोलावले आणि त्यांच्याकडे तो ड्राफ्ट दिला. त्या दोघांनाही बंगाली भाषेची चांगली माहिती असल्याने त्यांनी अतिशय सुंदर असा भावांनुवाद केला. सत्यजित रे एकदम खुश झाले. आणि त्यांनी चित्रपटावर काम करायला सुरुवात केली. संजीव कुमार, सईद जाफरी, शबाना आजमी, फरीदा जलाल, फारुख शेख आणि गांधी या सिनेमाचे दिग्दर्शक ऑस्कर विजेते सर रिचर्ड अटेनबरो यांनी या सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका केल्या.(Satyajit Ray)
===========
हे देखील वाचा : ‘हा’ सुपरहिट सिनेमा आशा पारेखला कसा मिळाला ?
===========
अशा पद्धतीने सत्यजित रे यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘शतरंज के खिलाडी’ रुपेरी पडल्यावर झळकला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र त्याला अजिबात व्यावसायिक यश मिळाले नाही याचे कारण सत्यजित रे (Satyajit Ray) यांना हुकमी यशाच्या हिंदी सिनेमाचा फॉर्मुला काही माहित नव्हता. किंबहुना त्यांनी त्या पद्धतीने सिनेमा बनवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यामुळे साहजिकच चित्रपटाला मर्यादित व्यावसायिक यश मिळाले. रे यांच्या या सिनेमाची जागतिक पातळीवर देखील फारशी दाखल घेतली गेली नाही. सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला पूर्ण लांबीचा हिंदी सिनेमा एवढीच याची आठवण उरली आहे.