Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….
मुंबईत सध्या पहिले जागतिक वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ (Waves summit 2025) आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी या जागतिक परिषदेचा शुभारंभ झाला होता. या परिषदेला भारतीय चित्रपट आणि मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली असून विविध विषयांवर चर्चा सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी एका चर्चा सत्रात करिना कपूर-खान हिला हॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्राप्रमाणे तु काम का करत नाहीस असं विचारलं असता तिने फार चपळतेणे उत्तर देत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. (Kareena Kapoor-Khan)

प्रियांका चोप्रा किंवा इतर अभिनेत्रींप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता करिना (Kareena Kapoor) म्हणाली की, “मी तर इकडेच ठिक आहे. मी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करुन आनंदी आहे. मला हिंदी गाण्यांवर डान्स करायला आणि हिंदी डायलॉग्ज बोलायला सुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर करिनाने तिच्या जब वी मेट या चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला. ‘भटिंडा की सीखडी हूं’ हा डायलॉग बोलायला मला प्रचंड आवडतं. माझं स्वत: वर खूप प्रेम आहे. आता हा डायलॉग बघा तो बोलण्यात किती मजा येते. मला तर वाटतं प्रत्येक मुलीने तसेच महिलेने हा डायलॉग म्हणायला पाहिजे. कारण तो प्रत्येक स्त्रीला समर्पित आहे.” असं करिना म्हणाली. (Hollywood and Bollywood film industry)
=======================================
हे देखील वाचा: Paresh Rawal १५ दिवस पित होते त्यांचीच लघवी? अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ
========================================
दरम्यान, मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये ४ दिवस सुरु असणाऱ्या या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज २०२५’ परिषदेत मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपट सृष्टीतील कलाकार उपस्थित आहेत. वेव्हज समिट भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल इनोव्हेशनचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, जागतिक दर्जाच्या या परिषदेला मराठी कलाकारांनीही आवर्जून हजेरी लावली होती. यात महेश कोठारे, मृणाल कुलकर्णी, अलका कुबल, निशिगंधा वाड, अमृता खानविलकर, सचिन खेडेकर, श्रवणी देवधर, इला भाटे, महेश लिमये, दिग्दर्शक स्वप्ना जोशी वाघमारे, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, ओम राऊत अशा कलाकारांचा समावेश आहे. (Waves summit 2025)