Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg

‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg Boss Marathi च्या एक्स स्पर्धक Trupti Desai यांची पोस्ट व्हायरल

 Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg Boss Marathi च्या एक्स स्पर्धक Trupti Desai यांची पोस्ट व्हायरल
Bigg Boss Marathi 6 Update
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg Boss Marathi च्या एक्स स्पर्धक Trupti Desai यांची पोस्ट व्हायरल

by Team KalakrutiMedia 25/02/2026

सध्या बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi 6) च्या सहाव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू असताना चौथ्या सीझनमधील स्पर्धक  तृप्ती देसाई (Trupti Desai)  यांनी केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या सीझनची आठवण करून देत सध्याच्या स्पर्धकांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचं मानलं जात आहे. तृप्ती देसाईंनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना एक खास प्रसंग शेअर केला आहे. त्या लिहितात, “बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून “सलमान खान” यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता.” हा किस्सा स्वतः महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मिश्किलपणे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या आठवणीसोबतच त्यांनी त्यांच्या सीझनबद्दल ठाम मत व्यक्त करत लिहिलं आहे की, “आमच्या सिझनसारखी मजा त्यानंतरच्या कोणत्याच सीझनमध्ये अजिबातच नाही हे मात्र तितकच खरं आहे.” (Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

तृप्ती देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये बिग बॉसच्या घराचं स्वरूपही स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मते ते फक्त वाद आणि प्रसिद्धीचं व्यासपीठ नसून एक घर आहे. त्या म्हणतात, “ते घर आहे…. तिथे माणुसकी ,नाती जपणं, टास्क खेळणं, कोणालाही जेवण कमी पडून न देणे हे सर्व सुद्धा पाहणे गरजेचं आहे आणि आम्ही हे सर्व जपण्यात यशस्वी झालेलो होतो.” या विधानातून त्यांनी त्यांच्या सीझनमधील वातावरण अधिक सकारात्मक आणि नात्यांना जपणारं होतं, असं अधोरेखित केलं आहे.त्याबरोबर त्यांनी पुढे अभिमानाने लिहिलं की, “आमचा सीजन संपून तीन वर्ष होऊन गेले परंतु या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाला तो सकारात्मकरित्या लक्षात आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रेमसुद्धा आम्हाला मिळत आहे, आम्ही रीलस्टार म्हणून नाही ‘रियल स्टार’ म्हणून त्या सीजनमध्ये कंटेस्टंट होतो याचा प्रचंड अभिमान आहे.”

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

सध्या सुरू असलेल्या सहाव्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची संख्या अधिक असल्याने त्यांच्या या विधानाकडे अनेकांनी ‘रील स्टार्स’वर टोला म्हणून पाहिलं आहे. काही चाहत्यांनी त्यांच्या मताला दुजोरा दिला, तर काहींनी सध्याच्या स्पर्धकांचे समर्थन करत प्रत्येक सीझनची शैली वेगळी असते, असं मत व्यक्त केलं. (Bigg Boss Marathi 6)

==================================

हे देखील वाचा: Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना…

==================================

तृप्ती देसाई यांच्या या पोस्टमुळे ‘रियल स्टार’ विरुद्ध ‘रील स्टार’ असा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा सध्याचा सीझन जितका घरात रंगतोय, तितकाच तो घराबाहेरही चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss controversy Bigg Boss Marathi Bigg Boss Marathi 4 bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi 6 news Celebrity Entertainment mahesh manjrekar marathi reality show Real Star reel star salman khan Trupti Desai Trupti Desai post
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.