Sanjay Dutt च्या मुलीला पाहून लोकं म्हणाले, “नर्गिसजी परत आल्या…”

या’ आठवड्यात OTT वर कलाकृतींची मेजवानी!
प्रेक्षकांना वीकेंड आला की घरबसल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत काय बसून पाहायचं हा प्रशन नक्कीच पडतो… चला तर मग जाणून घेऊयात या आठवड्यात ओटोटीवर कोणते चित्रपट-वेब सीरीज रिलीज होणार आहेत…
Hostage
मॅट चारमन निर्मित ही ब्रिटिश मिनी-सीरीज राजकीय थ्रिलरचा जबरदस्त अनुभव देणारी असून, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांमधील काल्पनिक सत्तासंघर्ष जूली डेल्पी आणि सारा जोनास यांच्या दमदार अभिनयातून उलगडताना दिसेल. ही सीरीज २२ ऑगस्ट २०२५ रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

द मॅप दॅट लीड्स यू
लासे हॉलस्ट्रॉम दिग्दर्शित हा Amazon MGM Studios निर्मित रोमँटिक ड्रामा एक हृदयस्पर्शी प्रेमकथा असून यात मॅडलिन क्लाइन, केजे आपा आणि सोफिया वायल्डे यांच्या भूमिका प्रेक्षकांना स्वप्नांच्या जगात हरवून टाकतील. ही सीरीज प्रेक्षकांना Amazon Prime Video वर पाहता येणार आहे…

सूत्रवाक्यम
युजीन जोस चिरामेल दिग्दर्शित हा मल्याळम कॉमेडी ड्रामा असून, शाईन टॉम चाको, विंची अलोशियस आणि दीपक परंबोल यांचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे… Lionsgate Play वर २२ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

थलाईवन थलाईवी
पंडीराज दिग्दर्शित हा कौटुंबिक नात्यांतील खट्याळ प्रसंगांनी सजलेला विनोदी तमिळ ड्रामा चित्रपट असून, विजय सेतुपती आणि नित्या मेनन यांच्या जोडीमुळे प्रेक्षक हसून वेडे होणार आहेत… Amazon Prime Videoवर 22 ऑगस्टला हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे…
