काय आहे राज कपूर व गायक सुरेश वाडकर यांचं नातं…
पतझड सावन बसंत बहार, सीने में जलन आँखों में तुफान सा क्यूँ है, मोहब्बत क्या चीज हमें बताओ, मैं हूं प्रेम रोगी मेरी दवा तो कराओ, ए जिंदगी गले लगा ले, सदमा फिल्म मधील गाणी चप्पा चप्पा चरखा चले अशा सारख्या अनेक भावपूर्ण आणि आशयघन गाण्यांना आपल्या आवाजाने अभिजात गाण्यांचा दर्जा मिळवून देणारे गायक म्हणजे सुरेश वाडकर ! (Suresh Wadkar)
सुरेश वाडकर यांच्या सुरमयी, मधासारखा गोड आवाजातील गाणी ऐकून त्रासलेला जीव झटक्यात शांत होतो. भले त्यांनी ‘सीने में जलन आँखों में तुफान सा क्यूँ है’ ही गाणे गायले असले तरी आपल्या मनात मात्र शांतता पसरते. त्यांच्या आवाजाची मोहिनी अनेक दिग्गज लोकांना पडली होती ज्यात गुलजार, आशा भोसले, लता मंगेशकर, राज कपूर होते.
सुरेशजींचा(Suresh Wadkar) जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावी झाला. त्यांचे वडील मिल कामगार होते आणि घरची परिस्थिती हालाकीची होती. आई मिल कामगारांसाठी जेवण बनवत असे. वडिलांना गायनाची आवड होती म्हणून त्यांनी त्यांचे ‘सुरेश’ नाव ठेवले. सुराचा ‘सु’ आणि ईश्वराचा ‘ईश’ असा त्याचा अर्थ होता आणि योगायोगाने लहानपणापासूनच सुरेश वाडकर यांना गायनाची आवड लागली. वयाच्या १० व्या वर्षापासूनच त्यांनी झियालाल वसंत यांच्याकडुन धडे गिरवायला सुरु केले होते. गुरूच्या सांगण्यावरून त्यांनी प्रयाग संगीत समिती मधून प्रभाकरची पदवी घेतली. ही पदवी त्या काळाच्या मानाने खूपच पुढची होती मग त्यांनावयाच्या २० वर्षी आर्यविद्या मंदिर मध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली
‘सूरशृंगार’ नावाची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यात अनेक दिग्गज जज म्हणून असतात. रवींद्र जैन आणि जयदेव यांनी अशी घोषणा केली त्यांना फिल्ममधे गायनाची घोषणा केली. सुरेशजींनी ही स्पर्धा सहजरित्या जिंकली आणि रवींद्र जैन यांनी त्यांना ‘पहेली’ फिल्म मध्ये ‘झिलमिल’ नावाचे गाणे गायची संधी दिली.
‘गमन’ फिल्ममधे जयदेव यांनी ‘सिने मैं जलन हे’ गाणे गायची संधी दिली आणि सुरेशजी यांनी या गाण्याची एवढी रिहर्सल केली की ते त्यात गढून जात. जेव्हा रेकॉर्डिंगची वेळ आली तेव्हा सुरेशजींनी एका टेक मध्ये गाणे ओके गाऊन टाकले. गाणे एका टेक मध्ये ओके झाले तरी सुरेश वाडकर आपल्या गायनाने समाधानी नव्हते. संगीतकार जयदेव यांना त्यांनी अजून एक टेकची विनंती केली, पण जयदेव यांनी हा टेक ओके आहे आणि अजून टेकची गरज नाही आहे. रेकॉर्डिंग झाल्यावर ते घरी गेले आणि त्यांनी आपल्या बहिणीला याबद्दल सांगितले. मोठ्या बहिणीने त्यांना जयदेव यांच्या जजमेंट वरती विश्वास ठेवायला सांगितले. पण सुरेशजी खूप काळ अस्वस्थ होते. गाणे काही दिवसांनी रिलीज झाले आणि हिट झाले.(Suresh Wadkar)
लतादीदी त्यांच्या आवाजाने खूप इम्प्रेस झाल्या होत्या आणि सुरेशजी त्यांना आई मानत. खूप वेळा लतादीदी सुरेशजींचे नाव म्युझिक डिरेक्टरला रेकमण्ड करत असत. असेच त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना त्यांचे नाव सुचवले आणि त्यांनी त्यांचे गाणे ऐकले व लतादीदींसोबत गायनाची संधी दिली.
============
हे देखील वाचा : अमिताभच्या ‘या’ हिरोईनचा का झाला असा दर्दनाक
============
१९८३ पर्यंत सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना सिने में जलन साठीच ओळखले जाऊ लागले होते. तेव्हा राज कपूर प्रेम रोग या आपल्या फिल्मसाठी नवीन गायकाला शोधत होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी सुरेश वाडकर यांचे नाव सुचवले. राज कपूर यांनी त्यांना बोलवून त्यांचा आवाज ऐकला. ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी त्या फिल्म मध्ये ४ गाणी गाऊन घेतली.
प्रेम रोगी सुरेश वाडकर यांच्यासाठी गेम चेंजर ठरली आणि ते मुकेश नंतर राज कपूर यांचे सगळ्यात आवडते गायक बनले. ऋषी कपूर यांना त्यांचा आवाज एवढा परफेक्ट फिट बसला की पुढील सर्व फिल्मसाठी त्यांनी सुरेश वाडकर यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. ते सुरेश वाडकर यांचे एवढे फॅन झाले की त्यांनी एका पार्टीत सुरेश वाडकर यांना उद्देशून जाहीर केले की ‘बेटा जब तक मैं जिंदा हूँ तब तक मेरी फिल्मो में तुम और लता हमेशा गाओगे’. राज कपूर यांनी हे वचन शेवटच्या श्वासापर्यंत हे वचन पाळले.