Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार

Shashi Kapoor यांना राज कपूर यांनी कोणता मोलाचा सल्ला दिला होता?
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कपूर घराण्यातील कलावंत शशी कपूर (Shashi Kapoor) यांना सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला होता स्वतःला सिद्ध करण्यासाठी. वडील पृथ्वीराज कपूर, बंधू Raj Kapoor आणि शम्मी कपूर ही मोठी नाव जोडलेली असताना देखील स्वतःची स्वतंत्र ओळख करून देण्यासाठी शशी कपूर यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सोपं काहीच नव्हतं. सुरुवातीच्या काळात त्यांच्या अनेक चित्रपटांना अपयशाला सामोरे जावे लागले.

साठच्या दशकाच्या सुरुवातीला बी आर चोप्रा यांनी ‘धर्मपुत्र’ आणि दिग्दर्शक बिमल रॉय यांनी शशी कपूरला ‘प्रेम पत्र’ या चित्रपटासाठी सांगितल साइन केले आणि त्यानंतर इतर चित्र संस्थांचा शशीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. याच काळात दक्षिणेतील एव्हीएम प्रोडक्शन यांनी शशी कपूर यांना त्यांच्या एका आगामी सिनेमासाठी साइन केले. त्याचा ५००० रुपये ऍडव्हान्स देखील त्यांना दिला. शशी कपूर (Shashi Kapoor) दक्षिणेतील नामवंत बॅनर एव्हीएममध्ये काम करायला मिळते आहे म्हणून खुश होते कारण त्या काळात एव्हीएम संस्थेचे नाव देशभर गाजत होते.

दक्षिणात्य भाषेसोबत इतर प्रादेशिक भाषात देखील त्यांची चित्रनिर्मिती होत होती. पण शशी कपूर (Shashi Kapoor) यांचा हा आनंद फार कमी काळ टिकला नाही. कारण याच काळामध्ये शशी कपूरचा ‘चार दिवारी’ (दि. कृष्णन चोप्रा) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर फ्लॉप झाला. नायक म्हणून त्याचा हा पहिलाच प्रदर्शित सिनेमा होता. साहजिकच शशी कपूर यांच्या अपयशावर त्या काळातील मीडियामध्ये बोलले जाऊ लागले. त्यांची तुलना त्यांच्या दोन मोठ्या भावांशी होऊ लागली आणि शशी कपूर कसा कमजोर अभिनेता आहे यावर चर्चा रंगू लागली. शशी कपूर यांच्यासाठी हा खूप टफ पिरियड होता.
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : ‘आ चल के तुझे मैं लेके चलू…’ गाण्याचा किस्सा
============
याच काळात एव्हीएम प्रोडक्शन कडून शशी कपूर यांना एक पत्र मिळाले. त्यात त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातून Shashi Kapoor यांना काढून टाकले होते आणि दिलेला ५००० रुपये ॲडव्हान्स परत करायला सांगितले होते. शशी कपूर यांच्यासाठी ही खूप धक्कादायक बातमी होती. ५००० ही रक्कम त्या काळात खूप मोठी होती. पैशापेक्षाही ज्या पद्धतीने एव्हीएम यांनी त्यांना सिनेमातून काढून टाकलं होतं ते त्यांना जास्त क्लेशदायक वाटत होतं.

शशी कपूर (Shashi Kapoor) यांनी याबाबत आपल्या मोठ्या भावाशी चर्चा केली. राज कपूर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना सल्ला दिला, ”उद्या तू ताबडतोब एव्हीएम यांचा पाच हजार रुपयांचा ऍडव्हान्स परत करून टाक. कारण आता त्यांनी तुला चित्रपटातून काढून टाकले आहे असं असताना ते पैसे स्वतःकडे ठेवणे हे अनएथिकल आहे आणि लक्षात ठेव ही फिल्मी दुनिया आहे. इथे हरणाऱ्या घोड्यावर कोणीच पैसे लावत नाही. इथे पैसे लावले जातात हे जिंकणाऱ्या घोड्यावर. त्यामुळे इथे खूप सांभाळून राहावं लागतं. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी इथली संस्कृती आहे. त्यामुळे अपयशाने कधी खचून जायचं नाही. उलट अपयश ही एक संधी समजायचं आणि त्यातून भरारी घ्यायची.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाने कधीही हुरळून जायचे नाही. कारण डोक्यात गेलेले यश हे अपयशाचे पहिले कारण असते. तेव्हा करिअरच्या सुरुवातीलाच हे मनाशी घट्ट समजावून घे की ही फिल्मी दुनिया अशीच जालीम असते आणि आपल्याला असंच यातून पुढे मार्ग काढत पुढे जायचे असते!” शशी कपूरने आपल्या मोठ्या भावाचे अनुभवाचे बोल ऐकले आणि एव्हीएमचा पाच हजार रुपये ऍडव्हान्स परत केला आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने करिअर घडवायच्या च्या कामाला लागला. प्रेमपत्र, धर्मपुत्र चित्रपट चांगले असूनही यथातथाच चालले. पण पुढे दोन वर्षातच त्यांचा जब जब फुल खिले हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि शशी कपूर (Shashi Kapoor) खऱ्या अर्थाने इथेच क्लिक झाला! राज कपूर यांचा सल्ला त्यानी आयुष्यभर लक्षात ठेवला!