…जेव्हा अभिनेता प्राण यांनी वीस फूट उंचावरून खाली उडी मारली!
आपल्या खलनायकीच्या अदेने हिंदी सिनेमांमध्ये सर्वोत्तम खलनायक ही पदवी मिळवणारे अभिनेता प्राण (Pran) खरोखरच ग्रेट ऍक्टर होते. ते जितके महान अभिनेते होते तितकेच महान व्यक्ती देखील होते. पडद्यावर भले त्यांनी व्हिलनगिरी केली असली तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र ते अतिशय नेकदिल इंसान होते. त्यांना स्टंट करायला खूप आवडायचं.
खरंतर हिंदी सिनेमात असे स्टंट करण्यासाठी जनरली ‘बॉडी डबल’चा वापर करतात. बॉडी डबल म्हणजे ॲक्टर सारखेच दिसणारे स्टंटमन किंवा स्टंटवुमन असतात. ॲक्टर्सला इजा होऊ नये म्हणून हे असे रिस्की शॉट ते देत असतात पण बऱ्याचदा अभिनेते प्राण (Pran) यांचा आग्रह असायचा की “ते शॉट मी स्वतः देईन.” याचे कारण त्यांना पत्रकाराने विचारले होते. तेव्हा ते म्हणाले की, ”हाच तर माझा खरा फिटनेस आहे. मी माझ्या स्वतःच्या फिटनेसची अशा पद्धतीने टेस्ट करत असतो!” पण या अशा त्यांच्या स्टंट्समुळे बऱ्याचदा त्यांना शारीरिक इजा देखील झाली होती.
१९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटात त्यांच्या नाकाला इजा झाली होती. त्यांचे नाक फुटले होते. त्यातून रक्तस्त्राव झाला होता. नासिर हुसैन दिग्दर्शित या चित्रपटात नायक शम्मी कपूर आणि खलनायक प्राण (Pran) यांच्यात बॉक्सिंगचा एक सीन होता. दिग्दर्शकाने यासाठी दोघांचे बॉडी डबल अरेंज केले होते. त्यांच्यात तो शॉट चित्रित झाला. पण काही क्लोजअप सिनसाठी या दोघांनाच फाइट्स शॉट द्यायचे होते. त्या पद्धतीने दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी दोघांनाही कल्पना दिली. शम्मी कपूर बॉक्सिंगचा एक ठोसा यांच्या चेहऱ्यावर मारतो आणि प्राण तो चुकवतो अशा पद्धतीचा तो शॉट होता. असे तीन शॉट त्यात होते.
पहिले दोन शॉट्स व्यवस्थित झाले तर तिसरा शॉटला गडबड झाली. प्राणमागे वळण्याचा ऐवजी थोडे पुढे आले. त्यांचे टायमिंग चुकले आणि तो ठसा प्राण (Pran) यांच्या नाकावर बसला. घाव इतका वर्मी लागला होता की प्राण यांचे नाक फुटले आणि त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी सेटवर डॉक्टर वगैरे नसायचेच. शिवाय मेडिकल एड देखील खूप बेसिक लेव्हलची असे. त्यामुळे सगळीकडे मोठा हलकल्लोळ झाला. शम्मी कपूर मात्र खूप घाबरला होता. तो प्राणला सारखा ‘सॉरी प्राण सर सॉरी प्राण सर…’ असे म्हणत होता.
कारण शम्मीचा तोपर्यंत एकही चित्रपट हिट झाला नव्हता प्राण (Pran) त्यावेळी स्टॅबलिस्ट स्टार होते. त्यामुळे शम्मी कपूरला खूपच गिल्टी वाटत होते. लगेच सेटवर बर्फ आणला तो प्राणच्या नाकावर ठेवल्यामुळे रक्तस्राव थांबला. पण शम्मी कपूर मात्र सॉरी सॉरी म्हणण्याचे काही थांबत नव्हता! तेव्हा प्राण यांनी नाकावर रुमाल ठेवत म्हणाले, ”शम्मी ये क्या पागल पन है? यात तुझी काय चूक? माझ्याकडूनच नीट मागे वळता न आल्यामुळे तो ठसा माझ्या नाकावर बसला. त्यामुळे तू काही वाईट वाटून घेवू नकोस. तुझी काहीच चूक नाही. चूक असलीच तर माझी आहे आणि सिनेमात अशा गोष्टी घडत असतात!” लगेच दिग्दर्शकाकडे वळून म्हटलं, ”नासीर साब अगला शॉट कौनसा है?”
प्राण यांनी एकदा एका चित्रपटाच्या वेळी चक्क वीस फुटावरून उडी मारली होती. त्या वेळी त्यांचे वय ५५ वर्षे होते. हा शॉट १९७६ सालच्या ‘दस नंबरी’ या चित्रपटासाठी घेतला जात होता. खरं तर दिग्दर्शक मदन मोहला यांनी त्यांना सांगितलं होतं इथे आपण बॉडी डबल वापर करू. पण प्राण यांनी सांगितलं, ”नाही. मी स्वत: शॉट देतो!” आणि प्राण यांनी वयाच्या ५५ वर्षी चक्क वीस फुटावरून उडी मारली.
==========
हे देखील वाचा : भारत भूषण यांच्या घरासमोर कुणी ठिय्या आंदोलन केले?
==========
शॉट ओके झाला. पण प्राण (Pran) यांच्या पायाला मात्र दुखापत झाली त्यांचे पायाचे अँकल बोन फ्रॅक्चर झाले. पुढे महिनाभर प्राण पायाला प्लास्टर घालून बसले होते. पण महिनाभरा नंतर त्यांनी पुन्हा शूटिंग सुरू केलं तेव्हा ‘डॉन’ या चित्रपटाची शूटिंग चालू होते. या चित्रपटात सुरुवातीला काही वेळ आपल्याला प्राण लंगडताना दिसत होता हे त्याचे लंगडणे ‘दस नंबरी’ शूटच्या वेळी झालेल्या दुखापतीमुळे होते!