Ganpati Festival 2025 : गणेशोत्सवात घरबसल्या नक्की पाहा बाप्पाचे हे

ऐश्वर्या रायची प्रेग्ननसी आणि Madhur Bhandarkar यांचं डिप्रेशन; काय आहे कनेक्शन?
वास्तववादी चित्रपटांमध्ये हातखंडा असणाऱे दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा आज वाढदिवस… ‘पेज ३’, ‘फॅशन’, ‘चांदनी बार’ असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे मधुर भांडारकर चक्क एकदा ऐश्वर्या राय (Aishwerya Rai-Bachchan) हिच्या गरोदरपणामुळे डिप्रेशनमध्ये आले होते… चकित व्हायला झालं असेल ना… की ऐश्वर्याच्या प्रेग्ननसीचा मधुर यांच्या डिप्रेशनशी काय संबंध…? चला तर मग जाणून घेऊयात…(Bollywood News)

तर, २०१२ मध्ये मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘हिरोईन’ (Heroine) चित्रपट आला होता… यात जरी प्रमुख भूमिकेत करिना कपूर (Kareena Kapoor-Khan) दिसली असली तरी आधी या चित्रपटात ऐश्वर्या राय ही प्रमुख नायिका होती… झालं असं की, अभिशेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्या रायने हिरोईन चित्रपट साईन केला… मात्र, त्यानंतर काही काळ ऐश्वर्याने ती गरोदर असल्याची बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती… आणि ज्यावेळी मधुर यांना याबद्दल समजलं तेव्हा ते शॉक झाले होते… कारण, ‘हिरोईन’ चित्रपटाची प्रमुख नायिका ऐश्वर्या असेल आणि ती कशा पद्धतीने काम करेल हे सारं काही मधुर यांच्या डोक्यात फिक्स होतं… दीड वर्षापेक्षा अधिक काळ मधुर यांनी त्या विषयावर रिसर्च केला होता… परंतु, अचानक ऐश्वर्याच्या गरोदरपणाच्या बातमीने संपूर्ण टीमवर संकट कोसळलं होतं..(Entertainment)

मधुर भांडारकर यांचा ‘हिरोईन’ हा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. परंतु, ऐश्वर्याने आपली प्रेग्ननसी अनाऊन्स केली आणि चित्रपटातून काढता पाय घेतला… त्यावेळी डिप्रेशनमध्ये गेलेल्या मधुर यांना ऐश्वर्याचा फार राग आला होता… मुलाखतीत जाहिरपणे त्यांनी, “आमच्यापासून सत्य लपवलं”, असा आरोप देखी तिच्यावर केला होता… मात्र, ज्यावेळी हिरोईनचं शुट झालं तेव्हा त्यांना लक्षात आलं की या चित्रपटात अशी की दृश्य होती जी ऐश्वर्या गरोदरपणात शुट करु शकली नसतीच…
================================
हे देखील वाचा : ऐश्वर्या राय बच्चनने नाकारलेले पाच चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का??
=================================
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर ऐश्वर्याने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती… मात्र, तिच्यासोबत तिचे सासरे अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) खंबीरपणे उभे राहिले होते… त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “सगळ्यांना माहित होतं की ज्यावेळी तिने हिरोईन चित्रपट साईन केला होता तेव्हा तिचं अभिषेक बच्चनसोबत लग्न झालं होतं… यावरुन तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एखाद्या कलाकाराने लग्न करु नये किंवा मुल जन्माला घालू नये? मला असं वाटत नाही की कुठल्याही चित्रपटाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कलाकाराने लग्न करु नये किंवा फॅमेली प्लॅन करुन नये असं काही लिहिलं असतं”…. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेते मधुर भांडारकर यांनी ‘सट्टा’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जेल’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘इंदु सरकार’, ‘कॅलेंडर गर्ल्स’, ‘इंडिया लॉकडाऊन’ अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे… (Madhur Bhandarkar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi