Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती!
सदाबहार अभिनेता देव आनंद यांनी त्यांच्या रोमांसिंग विथ लाईफ या आत्मचरित्रामध्ये राजकीय क्षेत्रात त्यानी केलेल्या अल्प मुशाफिरी बाबत तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्यां सोबत आलेला त्यांचा संबंध यावर विस्तृत भाष्य केले आहे. देव आनंद हे एक सुसंस्कृत अभिनेते होते. सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण होती. ते प्रामाणिक होते , वक्तशीर होते, कायम उद्याचा विचार करणारे होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत त्यांचे अतिशय चांगले संबंध होते.
भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मधील सदाबहार त्रिकूट दिलीप कुमार, राजकपूर आणि देव आनंद हे तिघेही अतिशय बुद्धिमान आणि इथल्या समाज मनाची नस ओळखणारे होते. पंतप्रधान नेहरू या तिघांसोबत कायम सल्ला मसलत करत असत. त्यामुळे या सर्वांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. १९६२ साली एकदा पंडित नेहरू एका मिटिंगच्या वेळी काहीसे गंभीर दिसल्यानंतर देव आनंद यांनी त्यांना विचारलं ,” सर, क्या हो गया ? आपकी कातिल मुस्कान क्या लेडी माऊंट बॅटन ले गई ?” या वाक्यानंतर पं . नेहरू यांना हसू आवरता आले नाही आणि ते म्हणाले,” अच्छा लगता है. जब कोई मेरे बारे में इस तरह की बाते करता है!”

सत्तरच्या दशकाच्या मध्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या विरुद्ध मात्र देव आनंद यांनी दंड थोपटले होते. त्यांना त्या काळात सरकार कडून होत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी वर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांना सरकार कडून होत असलेल्या अत्याचाराबद्दल चीड होती. ते उघडपणे काँग्रेसचा विरोध करत होते. युवा कॉँग्रेस कडून सरकारच्या समर्थनार्थ त्यांनी भाषण करावे अशी इच्छा व्यक्त केली ती देव आनंद यांनी साफ धुडकावून लावली. त्यानंतर देवच्या चित्रपटांना दूरदर्शनवर दाखवणे बंद केले आकाशवाणीतील ने देखील त्यांच्या गाण्यांवर काही काळ बंदी घातली होती.

देव आनंद यांनी राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर यावे अशी तत्कालीन जनता पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती. देव आनंद यांनी या काळात सर्व चित्रपट कलावंतांना घेऊन राजकीय पक्ष काढला होता. त्याचे नाव ठेवले नॅशनल पार्टी ऑफ इंडिया. शिवाजी पार्क मुंबई येथे त्यांनी मोठी रॅली देखील केली होती. त्या रॅली त त्यांनी सांगितले की,” तामिळनाडू त जर अभिनेते एम जी रामचंद्रन चमत्कार करू शकत असतील तर देश पातळीवर आपण का करू शकणार नाही? त्यांच्या या राजकीय पक्षाला ज्येष्ठ विधीज्ञ नानी पालखीवाला आणि पंडित नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी देखील पाठिंबा दिला होता. पण या राजकीय पक्षाचे आयुष्य फार काळ टिकले नाही. हळूहळू एकेक जण गळत गेले. राजकारणात जाऊन चमत्कार घडवून आणण्याचा देव आनंद यांचा विचार मागे पडला.
================================
हे देखील वाचा : Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी मंझिल’चा नायक राहिला असता!
================================
यानंतर वीस-बावीस वर्षांनी जेव्हा अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी फेब्रुवारी 1999 मध्ये लाहोर बस सुरू केली. या पहिल्या लाहोर बस यात्रेमध्ये त्यांनी देशातील कलावंत, पत्रकार, साहित्यिक यांना देखील घेतले होते त्यात देव आनंद यांचा देखील समावेश होता. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या शेजारच्या सीटवर देव आनंद यांच्या यांना बसवले होते. त्या वेळी देव आनंद यांनी अटलजीचा हात हातात घेऊन “आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले होते’ 2001 साली देव आनंद यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता. भाजप चे वरिष्ठ नेते रवीशंकर यांनी देव आनंद यांची सेंसर बोर्डाच्या अध्यक्ष पदी करणार होते तशी विनंती करायला ते गेले होते परंतु देव आनंद यांनी हे पद नम्रपणे नाकारले.