Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

Akshaye Khannaच्या मागे वेडी होती करिना कपूर; स्वत:चं दिली होती कबूली…
सध्या सगळीकडे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची आणि त्यातील रेहमान डकैत अर्थात अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) भूमिकेचीच जोरदार चर्चा सुरु आहे… खरं तर दिग्गज अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा असूनही २००० च्या दशकात फारसं यश अक्षय खन्नाला मिळालं नाही हे सत्यच आहे… परंतु, ‘Section 375’ चित्रपटानंतर अक्षयची गाडी सुस्साट सुटली आहे… ‘छावा’मध्ये (Chhaava) त्याने साकारलेला औरंगजेब तर भारीच होता… पण आता ‘धुरंधर’ मधला रेहमान डकैत त्याहून एक पाऊल पुढे गेला आहे… एकीकडे अक्षयच्या कामाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे करिना कपूर (Kareena Kapoor) हिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे… यात तिने, “अक्षय खन्ना माझा क्रश होता आणि त्याच्यामागे मी वेडी होते”, अशी कबूलीही करिनाने दिली आहे… नेमकं ती काय म्हणाली आहे जाणून घेऊयात…

तर, करिना कपूर आणि अक्षय खन्ना यांनी एकत्र ‘हलचल’ (Hulchal Movie), ‘३६ चायना टाऊन’, ‘एल.ओ.सी कार्गिल’ अशा काही चित्रपटांत एकत्रित कामं केली आहेत… दरम्यान, २००४ मध्ये आलेल्या ‘हलचल’ चित्रपटाच्या प्रमोशनचा करिनाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ती म्हणाली आहे की, “बॉलिवूडमधून जर का कोणत्या अभिनेत्याला हॉलिवूडमध्ये जायला हवं तर अक्षय खन्ना हे परफेक्ट नाव आहे… मी अक्षयचा ‘हिमालय पुत्र’ (Himalaya Putra) हा चित्रपट किमान २० वेळा तरी पाहिला आहे. त्यावेळी मी शाळेत शिकत होते आणि अक्षय खन्ना हा प्रत्येक मुलीचा क्रश होता. आणि मी देखील त्याच्यामागे अक्षरशः वेडी होते. तो फार क्युट आहे”, अशा शब्दांत करिनाने अक्षयचं कौतुक केलं होतं… (Bollywood News)

दरम्यान, अक्षय खन्ना आणि करिना कपूर यांचा ‘हलचल’ हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं आणि हा चित्रपट मल्याळम चित्रपट ‘गॉडफादर’चा हिंदी रिमेक होता. यात अक्षय आणि करिनासोबत सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, अमरीश पुरी आणि परेश रावल, नीना कुलकर्णी अशी भलीमोठी स्टारकास्ट होती… (Kareena Kapoor Viral Video)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं ?
================================
अक्षय खन्ना याचा ‘धुरंधर’ सगळीकडे धुमाकूळ घालत आहेच… आता लवकरच अक्षय दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार असून लेखक प्रशांत वर्मा यांच्या ‘महाकाली’ (Mahakali) चित्रपटात शुक्राचार्य यांच्या भूमिकेत दिसणार आहे… तर, दुसरीकडे करिना कपूर खान मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटात तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi