Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग

Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा

‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर;

Sushmita Sen वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने स्वतः

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna

Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा पंतप्रधानांनी Meena Kumari हिला ओळखलेच नाही!

 जेव्हा पंतप्रधानांनी Meena Kumari हिला ओळखलेच नाही!
बात पुरानी बडी सुहानी

जेव्हा पंतप्रधानांनी Meena Kumari हिला ओळखलेच नाही!

by धनंजय कुलकर्णी 28/10/2025

साठच्या दशकामध्ये जेव्हा अभिनेत्री मीनाकुमारी लोकप्रियतेच्या शिखरावर होती तिच्या अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव साजरा केला होता आणि जनसामान्यात तिच्या चित्रपटांनी एक वेगळी इमेज निर्माण केली होती या काळात तिला एका वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले होते! ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या On Leaders and Icons: From Jinnah to Modi’  या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. हि घटना साधारणतः १९६४-६५  सालची असावी.

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री मुंबईच्या  दौऱ्यावर आले होते, त्या वेळेला त्यांना एका चित्रपटाच्या सेटवर सिनेमाची शूटिंग दाखवण्यासाठी त्यांना बोलावले होते. चित्रपट होता कमाल अमरोही यांचा ‘पाकीजा’.  पंतप्रधान येणार म्हणून चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान सेटवर आले. त्यांचे आगत स्वागत जोरदार झाले. त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी चित्रपटाच्या अभिनेत्री आणि अकमल अमरोही यांच्या पत्नी मीना कुमारी पुढे आल्या. त्यांनी पंतप्रधानांच्या हातात पुष्पगुच्छ दिला आणि अभिवादन केले. त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शेजारी पत्रकार कुलदीप नय्यर उपस्थित होते.

पंतप्रधानांनी हळूच नय्यर यांना  विचारले,” या महिला कोण आहेत?” आता आश्चर्यचकित होण्याची वेळ कुलदीप नय्यर यांची होती. ते म्हणाले,” सर, या ख्यातनाम  अभिनेत्री मीनाकुमारी आहेत.  या हिंदी सिनेमातील सध्याच्या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तुम्ही यांचे चित्रपट पाहिले नाहीत का?”  पंतप्रधान शास्त्री  निरागसपणाने  म्हणाले,” नाही! मी पाहिलेले  नाहीत.!” त्यावर नय्यर  यांनी मीनाकुमारीच्या  काही लोकप्रिय सिनेमांची नावे सांगितली ‘बैजूबावरा’, ‘दिल एक मंदिर’, ‘आरती’, ‘दिल अपना और प्रीत पराई’… . शास्त्रीजी म्हणाले,”मी खरंच मागच्या ३० वर्षात कोणताही चित्रपट पाहिलेला नाही!”  

त्यानंतर जेव्हा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री बोलण्यासाठी उभे राहिले त्या वेळेला त्यांनी मीनाकुमारी यांच्याकडे पाहत म्हटले,” माफ करा मीनाकुमारी जी. मी आपल्याला ओळखले नाही.  मी आपले नाव आज पहिल्यांदा ऐकले. कारण मी मागच्या अनेक वर्षात एकही चित्रपट पाहिला नाही!”  देशाच्या पंतप्रधानाने एका अभिनेत्रीची माफी मागणे हा पंतप्रधानांचा साधेपणा आणि कलाकाराविषयीचा आदर सर्वाना खूप भावला. शास्त्रीजी यांचा  प्रामाणिकपणा, निरागसपणा आणि सच्चेपणा पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाने  टाळ्या वाजवल्या. शास्त्रीजी खरोखरच अतिशय निरलस असं व्यक्तिमत्व होतं.

================================

हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!

================================

चित्रपटसृष्टीशी त्यांचा काही संबंध नव्हता, एका सिनेमासाठी मात्र त्यांचे नाव जोडले गेले होते. तो चित्रपट होता मनोज कुमार यांचा ‘उपकार’. १९६५  साली  जेव्हा मनोज कुमार यांचा ‘शहीद’ हा चित्रपट राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आला तेव्हा मनोज कुमार यांची भेट पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबत झाली. तेव्हा शास्त्रीजी यांनी मनोज कुमारला ‘शेतकरी आणि सैनिक’ यांच्यावर चित्रपट काढायला सांगितले’ ‘जय जवान जय किसान’ हा त्यांचा त्या काळाचा नारा होता.

पंतप्रधान यांनी व्यक्त केलेली इच्छा मनोज कुमार यांनी मनावर घेतली आणि परतीच्या दिल्ली ते मुंबई या रेल्वे प्रवासात त्यांनी ‘उपकार’ या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहून काढली!  आणि १९६७ साली  हा चित्रपट तयार झाला. दुर्दैवाने हा चित्रपट पाहायला लाल बहादूर शास्त्री मात्र हयात नव्हते.  ११  जानेवारी १९६६  या दिवशी त्यांचा ताश्कंद येथे दुर्दैवी आणि संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या नंतर तब्बल पन्नास वर्षांनी ‘ताश्कंद फाईल्स’  हा चित्रपट आला होता! पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा चित्रपट सृष्टी तरी संबंध नसला तरी या तीन सिनेमातील घटना त्यांच्या जीवनाशी रिलेटेड होत्या.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: lal bahadur shahstri meena kumari meena kumari songs prime minister of india retro news of bollywood
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.