‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

एकटं वाटलं की मुंबईतल्या ‘या’ खास ठिकाणी जाऊन बसते Actress Rinku Rajguru !
काही वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत असा एक सिनेमा आला ज्याने अक्षरशः इतिहास घडवला. तो म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट. या सिनेमातील गाणी, कथानक आणि कलाकार सगळंच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं. आजही टीव्हीवर सैराट लागला तर प्रेक्षक तो चुकवायचं नाव घेत नाहीत. सिनेमाच्या यशामुळे अनेक नवोदित कलाकारांचं करिअर घडलं. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या ही चार मुख्य पात्रं प्रेक्षकांच्या इतकी भावली की ते लगेचच घराघरांत पोहोचले. विशेष म्हणजे आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू तर अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली.(Actress Rinku Rajguru)

सैराट प्रदर्शित झाला तेव्हा रिंकू अजून शाळेत शिकत होती. पण तिच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले. अचानक तिच्यासाठी एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली. आज रिंकू अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकते आहे. गावात लहानाची मोठी झालेल्या रिंकूने करिअरला योग्य दिशा देण्यासाठी मुंबईत स्थायिक होण्याचा मोठा निर्णय घेतला.

गेल्या काही वर्षांपासून रिंकू मुंबईत एकटी राहते. तिचे आईवडील मात्र गावाकडे असतात. “मी फक्त घर आणि काम करणारी मुलगी आहे. बाहेर फारशी कुठे जात नाही. जेव्हा काम नसतं किंवा मला एकटं वाटतं तेव्हा मी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते. तिथे गेल्यावर मनाला खूप शांतता मिळते,” असं रिंकूने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात श्रद्धास्थान मानलं जातं. नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. रोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात, आणि अनेक सेलिब्रेटीजसुद्धा आपले खास क्षण इथूनच सुरू करतात. मग तो चित्रपटाचा मुहूर्त असो किंवा वैयक्तिक महत्त्वाचा टप्पा गणरायाच्या चरणी वंदन करूनच ते पुढे जातात.अगदी टेक रिंकू ही करते.(Actress Rinku Rajguru)
=============================
=============================
रिंकू राजगुरूच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर सैराटनंतर तिने कागर, आठवा रंग प्रेमाचा, झिम्मा 2, मेकअप, झुंड, बेटर हाफची लव्ह स्टोरी अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तिचा अभिनय प्रत्येक भूमिकेत वेगळा ठरला. लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला साडे माडे तीन या नव्या सिनेमातून येत आहे. सैराटच्या यशानंतर मिळालेली लोकप्रियता, मुंबईत एकटी राहून घडत असलेलं तिचं आयुष्य, आणि श्रद्धास्थान मानलेल्या सिद्धिविनायकाशी असलेली नाळ या सगळ्यामुळे रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या मनात अजून घट्ट घर करून बसली आहे.