‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ फिल्मचा हँडसम हिरो अरविंद स्वामी गेला कुठे?
नव्वदच्या दशकामध्ये साउथ कडील एक अभिनेता प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्याच्या पहिल्याच दोन सिनेमाने तो चक्क नॅशनल हिरो झाला होता. पण नंतर अचानक त्याच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडल्या की, तो सिनेमाच्या दुनियेतून अक्षरशः बाहेर फेकला गेला. खरंतर सुपरस्टार होण्याची कुवत असलेला हा अभिनेता अचानकपणे या दुनियेपासून दूर झाला. कोण होता हा अभिनेता असं काय घडले त्याच्या आयुष्यात की त्याला सिने इंडस्ट्रीज सोडून द्यावी लागली? हा अभिनेता होता अरविंद स्वामी. (Arvind Swamy)
नव्वदच्या दशकात आलेल्या ‘रोजा’ आणि ‘बॉम्बे’ या चित्रपटाचा हँडसम नायक. साउथ कडील कमल हसन. रजनीकांत यांच्यानंतर नव्वदच्या दशकात ज्या अभिनयाला प्रचंड लोकप्रियता लाभली तो अभिनेता म्हणजे अरविंद स्वामी. सुरुवातीच्या चित्रपटातून असे जबरदस्त यश मिळवून भारतातील तरुणींचा नॅशनल क्रश बनलेला अरविंद स्वामी (Arvind Swamy) अचानक कुठे गायब झाला? आज तर अरविंद स्वामी ला त्याचे प्रेक्षकच विसरून गेले आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी ही दुनिया. तिथे असेच होणार.
अरविंद स्वामीच्या (Arvind Swamy) आयुष्यातील चढउताराचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. अरविंद स्वामी एका बिजनेसमनचा मुलगा. त्याचे वडील व्ही डी स्वामी दक्षिणेकडील मोठे बिजनेसनंतर आई वसंता भरतनाट्यमची कलावंत. १८ जून १९७० रोजी जन्मलेल्या अरविंदला मात्र बिझनेसमन व्हायचं नव्हतं आणि कलाकार देखील व्हायच नव्हतं. त्याला व्हायचं होतं डॉक्टर. त्यासाठी त्याने त्याची तयारी देखील सुरू केली होती. पण वडिलांनी सांगितले एवढा मोठा बिझनेस कोण सांभाळणार? त्यामुळे नाईलाजाने त्याने चेन्नईला कॉमर्स कॉलेजला ऍडमिशन घेतले. वडील लखपती जरी असले तरी कॉलेजात जाणाऱ्या अरविंदला पॉकेट मनी म्हणून दिवसाला फक्त दहा रुपये मिळायचे! यातून अर्थातच त्याचे खर्च भागायचे नाहीत. हँडसम अरविंद ला त्या काळात मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या.
दक्षिणेतील हरेक ब्रँड त्याला घेऊन मॉडेलिंग करू लागला. तेव्हा त्याला एका मॉडेलिंगचे पाच हजार रुपये मिळत होते. हेच मॉडेलिंग त्याला चित्रपटाच्या दुनियेत घेऊन गेलं. त्याच्या सिनेमाच्या एंट्रीचा किस्सा मनोरंजक आहे. दिग्दर्शक मनीरत्नम ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस एक चित्रपट बनवत होते. त्यात त्यांना एका नवीन कलाकाराची गरज होती. त्याचवेळी त्यांना मॉडलिंगमध्ये काम करणाऱ्या अरविंदचा चेहरा दिसला त्यांनी त्याला लगेच स्क्रीन टेस्ट करता बोलावले. अरविंदने विचारले,” या चित्रपटात आणखी कोण काम करणार आहे?” मणीरत्नम म्हणाले ,”यात रजनीकांत आणि मामुट्टी यांच्या भूमिका आहेत.” अरविंदला वाटले आता झाली आपली सुट्टी. आपल्याला काय भूमिका मिळेल? पण दुसऱ्याच दिवशी मणीरत्नम यांनी फोन करून त्याला चित्रपटात भूमिका ऑफर केली. (Arvind Swamy)
तेव्हा अरविंद नम्रपणे नकार देत,” तुम्ही आधी माझ्या वडिलांशी आधी बोलून घ्या.” असे सांगितले. मणीरत्नम अरविंद स्वामीच्या (Arvind Swamy) घरी पोहोचले. वडिलांनी सिनेमात काम करायला चक्क नकार दिला. “आमचा एवढा मोठा बिझनेस सोडून याला कुठे सिनेमात काम करायला लावता?” असे विचारले. परंतु मणीरत्नम यांनी त्यांना पटवले आणि अरविंदचा सिनेमातील मार्ग प्रशस्त झाला. या चित्रपटात अरविंद स्वामींना एका आयएएस ऑफिसरची भूमिका दिली होती. जो आपल्या सख्या भावाला आणि डॉनला वाटेवर आणतो. त्याच्या पहिल्याच भूमिकेचे कौतुक झाले. हा चित्रपट होता १९९१ साली प्रदर्शित झालेला ‘थलपती’.मणीरत्नम तर अरविंद स्वामीच्या प्रेमात पडले त्यांनी लगेच त्याला पुढचा सिनेमा ऑफर केला. हा त्यांचा मोठा ड्रीम प्रोजेक्ट होता. काश्मिरी आतंकवादावर हा चित्रपट आधारित होता. यात अरविंद स्वामींनी एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका केली होती; ज्याचे या सिनेमात अतिरेक्यांकडून अपहरण केले जाते. चित्रपट होता ‘रोजा’. या सिनेमातील अरविंद स्वामींची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
अतिरेकी भारतीय तिरंग्याला आग लावतात तेव्हा तो आगीत उडी घेवून तिरंग्याला वाचवतो हा प्रसंग तर बेफाम झाला होता. चित्रपटाला ए आर रहमान यांचे संगीत होते. यात त्याची नायिका होती मधू. हा चित्रपट आधी तमिळमध्ये बनला. तिकडे लोकप्रिय झाल्यानंतर हा सिनेमा हिंदीमध्ये डब करून संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. रातोरात अरविंद स्वामी स्टार बनला. यानंतर मणीरत्नम यांनी अरविंद स्वामी (Arvind Swamy) आणि मनिषा कोईराला घेऊन ‘बॉम्बे’ हा चित्रपट बनवला.
बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या १९९२ सालच्या मुंबई दंगलीवर हा चित्रपट आधारित होता. यात अरविंदने एका हिंदू तरुणाची तर मनीषाने एका मुस्लिम युवतीची भूमिका केली होती. या चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. हरिहरन यांनी गायलेले तू ही रे, चित्रा हिने गायलेले कहना ही क्या आणि रेमो ने गायलेले हम्मा हम्मा प्रचंड लोकप्रिय ठरले. अरविंद स्वामींच्या यशाचा आणि लोकप्रियतेचा आलेख चढता राहिला. यानंतर अमिताभ बच्चन यांच्या ए बी सी एल च्या ‘सात रंग के सपने’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदा हिंदी सिनेमात भूमिका केली. परंतु एक दिवशी पिताजींनी फरमान काढले,” आता सिनेमा बास झाले आता बिजनेस सांभाळायला या!”
=========
हे देखील वाचा : वाघाच्या तावडीतून ‘या’ अभिनेत्याने वाचवले राखीचे प्राण
=========
त्यासाठी एमबीए करण्यासाठी तो अमेरिकेला गेला पण तिकडे गेल्यानंतर काही दिवसातच त्याला भारतातून निरोप आला की त्याच्या आईला कॅन्सल झाला आहे तो ताबडतोब भारतात परत आला. आई गेल्यानंतर काही महिन्यातच वडिलांचे निधन झाले. आता मात्र अरविंद स्वामींना आपला बिजनेस सांभाळावाच लागला. चित्रपटाकडे त्याने पूर्णतः पाठ फिरवली. याच काळात २००५ साली त्याचा एक भीषण अपघात झाला आणि त्याला मणक्याला जबरदस्त दुखापत झाली आणि तो पॅरलाइज झाला. त्याच्या शरीराची एक बाजू अजिबात हालचाल करत नव्हती. यातून बरे होण्यासाठी तब्बल पाच वर्षाचा काळ गेला पण या काळात त्याची वजन प्रचंड वाढले डोक्यावरचे केस कमी झाले. सिनेमा हा उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा बिजनेस आहे. इथे कोणी कोणाची वाट पाहत नाही.
पाच वर्षात पुला खालून खूप पाणी निघून गेलं होतं. आता अरविंद स्वामी श्रीमंत काम करायची इच्छा व्यक्त करून देखील त्याला काम मिळत नव्हते.मणीरत्नम यांनी त्याला काही भूमिका दिल्या पण आता ती जादू राहिली नव्हती. संकट आली की समुहाने येतात. त्याची पत्नी गायत्री राममूर्ती २०१० साली घटस्फोट घेऊन निघून गेली. अरविंद स्वामी (Arvind Swamy) सर्व बाजूने एकाकी पडला. २०१५ नंतर त्याने पुन्हा एकदा चित्रपटात येण्याचा प्रयत्न केला. आता तो निगेटिव्ह भूमिका द्वारे पडद्यावर येवू लागला. एकेकाळाचा हँडसम हिरो आता किरकोळ भूमिका करत होता. प्रेक्षकांना याचे वाईट वाटत होते पण करणार काय? किस्मत के खेल निराले मेरे भैय्या…