Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?
नवकेतन बॅनरच्या ‘Prem Pujari’ या १९७० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद (Dev anand) यांनी केले होते. चित्रपट दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. त्यापूर्वीचे नवकेतन संस्थेचे सर्व चित्रपट मोठा भाऊ चेतन आनंद, धाकटा भाऊ विजय आनंद, राज खोसला, अमरजीत यांनी दिग्दर्शित केले होते. दिग्दर्शनातील देव आनंद यांचा हा पहिलाच प्रयोग फसला होता. सिनेमा फारसा यशस्वी झाला नाही. खरं तर सिनेमा अप्रतिम बनला होता. पण असं म्हणतात न की ही इष्टापत्ती असते. देवच्या बाबतीत असेच झाले. या सिनेमाच्या शूटच्या दरम्यान त्यांना नेपाळच्या काठमांडूमध्ये पुढच्या चित्रपटाचे कथा बीज सापडले होते. प्रेम पुजारी जरी फ्लॉप झाला असला तरी त्याच्या पुढचा चित्रपट मात्र सुपर डुपर हिट झाला. या चित्रपटाची कथा त्यांना काठमांडूमध्ये सापडली होती. कोणता होता हा चित्रपट? आणि काय होता हा नक्की प्रकार?
Dev anand ने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले १९७० सालच्या ‘प्रेम पुजारी’ पासून. या चित्रपटात देवची नायिका Waheeda Rehman होती. चित्रपट अतिशय मेलडीयस असं संगीत होतं. (आठवा शोखियो में घोला जाये फुलोका शबाब, फुलो की रंग से दिल कि कलम से, रंगीला रे….) पण चित्रपटाला हवे तेवढी यश मिळाले. (रिपीट रनला मात्र हा सिनेमा चांगला चालला.) पण काठमांडूच्या वास्तव्यात एक अशी घटना घडली की ज्याने देव आनंदला त्याच्या पुढच्या चित्रपटाची कथा मिळाली.
देव आनंद (Dev anand) चा एक जर्मन मित्र त्याच काळात काठमांडूमध्ये आला होता. त्याने फोन करून देव आनंदला सांगितले, ”मी इथे एका डॉक्युमेंटरीच्या शूटिंगसाठी आलो आहे.” देवची उत्सुकता चाळवली. त्याने विचारले “डॉक्युमेंटरीचा विषय काय?” तेव्हा जर्मन मित्राने सांगितले, ”सध्या जगात तरुणाईमध्ये एक नवीन कल्चर डेव्हलप होत आहे. हिप्पी कल्चर. यामध्ये तरुण मुलं मुली नशा पाणी करून देवाच्या नावाची गाणी गात जगभर फिरत असतात. असेच काही जथे सध्या काठमांडूमध्ये आलेले आहेत आणि त्याचेच डॉक्युमेंटरी करण्यासाठी मी इथे आलेलो आहे!” देव आनंदला हे सर्व नवीन होतं आणि नावीन्यचा ध्यास हा कायम देव आनंदला असायचा.
त्यामुळे लगेच तो दुसऱ्या दिवशी मित्रासोबत हिप्पी लोकांना भेटायला गेला. तिथे त्याला बरेच तरुण नशा पाणी करत, चरस गांजा ओढत, Hare Krishna Hare Ram म्हणत गिटार वाजवत गाणी गात गाताना दिसली. त्यांचे केस वाढलेले होते. त्यांना कपड्याची शुध्द नव्हती. या सर्व तरुणाईला जगाची काही फिकर नव्हती. लोक काय म्हणतील? आपण कुठले कपडे घातले आहे? काही काही त्यांना भान नव्हतं. आपल्याच मस्तीमध्ये हे लोक वावरत होते. देव आनंद (Dev anand) ला हे खूप वेगळं आणि नाविन्यपूर्ण वाटलं. त्याच वेळेला त्याचं लक्ष त्या ग्रुपमधील एका मुलीकडे गेलं. ही मुलगी चक्क एक इंडियन होती. आता देवची उत्सुकता जास्त चाळवली. त्याला वाटले ही भारतीय वंशाची मुलगी या परदेशी हिप्पी कल्चर मध्ये काय करत आहे? तिथ कशी पोहोचली? हिची कहाणी काय? हे जाणून घेण्यासाठी त्याने त्या बार मालकाशी संपर्क साधला. त्याने सांगितले त्या मुलीचे नाव जेनिश असे आहे.
देव आनंद (Dev anand) त्याला विनंती केली की त्या मुलीला मला भेटायचे आहे एक मीटिंग फिक्स करा. त्या पद्धतीने बार मालकाने त्या दोघांची दुसऱ्या दिवशी मीटिंग फिक्स केली. देव आनंद तिला जाऊन भेटला आणि तिची कहाणी ऐकून घेतली. तिने सांगितले, ”मी भारतीय वंशाची जरी असले तरी माझे आई-वडील कॅनडामध्ये राहतात. माझे खरे नाव जसबीर आहे.” देवने जेव्हा तिच्या इकडे येण्याबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितले की, ”मी थोडीशी बंडखोर स्वभावाची आहे. ओपन कल्चरची स्वतंत्र विचाराची मुलगी आहे. मला कुणाच्या कह्यात रहायला आवडत नाही. माझी आई माझ्यावर बंधन टाकते ते मला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे एकदा मी आईच्या पर्समधून पैसे चोरले आणि या मुलामुलींच्या ग्रुपमध्ये राहू लागले. आता मला कुठलेही बंधन नाही. मी आजाद आहे. मी माझ्या मस्तीमध्ये जगते आहे. मी आनंदात आहे.”
============
हे देखील वाचा : ‘गीत गाता हूं मै…’ गाण्याच्या रेकोर्डिंगचा अफलातून किस्सा!
============
तिची स्टोरी ऐकल्यानंतर देवच्या डोक्यात लगेच कथेचा प्लॉट तयार झाला आणि त्याने तिथल्या तिथे आपल्या नवीन चित्रपटाचा कथा लिहून काढली आणि याच कथेवर पुढे ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा चित्रपट बनवला. त्याचे बव्हंशी शूट नेपाळमध्येच झाले आहे. या चित्रपटाचे टायटल खरंतर Manoj Kumar यांनी आधी बुक करून ठेवले होते. देव (Dev anand) लगेच मनोज कुमार यांना भेटला आणि त्याला आपल्या नव्या सिनेमाची स्टोरी सांगितली आणि मनोज कुमारकडून त्यांनी टायटल विकत घेतले अशा पद्धतीने ‘हरे राम हरे कृष्णा’ हा चित्रपट तयार झाला. या चित्रपटापासून नव्हते त्यांच्या बॅनरमध्ये आर डी बर्मन यांची इंट्री झाली!