Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Big Boss Ott 3 च्या घरातला वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट अदनान शेख नेमका आहे तरी कोण?
‘बिग बॉस ओटीटी ३‘मध्ये नुकताच होस्ट अनिल कपूरसोबत विकेंड का वॉर एपिसोड पाहायला मिळाला. ‘बिग बॉस ओटीटी ३’ दिवसेंदिवस रंजक ही होत चालले आहे. या आठवड्यात जिथे प्रेक्षकांनी चंद्रिका दीक्षितला एलिमिनेट होताना पाहिलं. त्याचबरोबर उरलेल्या स्पर्धकांचा खेळ आणखी एंनटेरटेनिंग होण्यासाठी बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली आहे. टीम 007 चा अदनान शेख नुकताच वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात दाखल झाला आहे. पण हा अदनान शेख नेमका आहे तरी कोण हे आज आपण सविस्तर जाणून घेउयात.( Influencer Adnaan Shaikh)

अदनान शेख हा 27 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि डान्सर आहे. तसेच त्याचे इन्स्टाग्रामवर तब्बल 11.3 दशलक्ष आणि यूट्यूबवर 568 हजार सबस्क्रायबर्स आहेत. तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओंसाठी ओळखला जातो आणि प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यामुळेच त्याची फॅन फॅालोविंग ही खुप मोठी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदनान शेख वर्षाला 1.20 कोटींपेक्षा जास्त कमाई करतो. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो एका एपिसोडसाठी एक लाख रुपये फी घेणार आहे. अदनान शेखची एकूण नेटवर्थ ७ कोटी रुपये असून तो अभिनय, मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून कमाई करतो.

अदनान शेख सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून तर ओळखला जातोच. पण घरातील विशाल पांडे आणि सना सुलतान यांच्याशी त्याचे चांगले संबंध आहेत. मात्र, शोच्या बाहेर लोकप्रिय इन्फ्लुएंसर लुकेश कटारिया सोबत तिचे संबंध चांगले नाहीत. शोच्या बाहेर अदनानने दिलेल्या काही मुलाखतींमध्ये तो लुकेश एल्विश यादवच्या मॅनेजरला फोन करताना ही दिसला होता.(Influencer Adnaan Shaikh)
================================
=================================
तसेच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अदनान म्हणाला होता की, विशाल पांडेत्याचा खूप जुना मित्र आहे. तसेच तो अरमान मलिकवर नाराज आहे. ”अरमान मलिकने विशालसोबत जे काही केले त्याला माझा पूर्ण विरोध आहे. त्यासाठी ते बेघर व्हायला हवे होते”. असे ही अदनान शेख या मुलाखतीत म्हणाला होता. आता बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात दाखल झाल्यानंतर अदनान शेख त्याचा गेम कसा खेळतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहीले आहे.