सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Harnaaz Kaur Sandhu : ‘बागी ४’ चित्रपटामुळे चर्चेत असणारी ही सुंदरी आहे तरी कोण?
टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असणारा ‘बागी ४’ (Baaghi 4) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे… विशेष म्हणजे यात रक्तरंजितपणा अधिक दिसणार असून संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे… या चित्रपटात सोनम बावजा आणि हरनाज संधू कौर (Harnaaz Kaur Sandhu) या दोन अभिनेत्री विशेष पात्र साकारणार आहेत.. तला तर मग ‘बागी ४’ मुळे चर्चेत असणाऱ्या हरनाजबद्दल जाणून घेऊयात…

तर, इस्रायलमधील इलात शहरात झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत (मिस युनिर्व्हस) भारताच्या हरनाज संधू हिने २०२१ मध्ये विश्वसुंदरीचा किताब वयाच्या २१व्या वर्षी पटकावला होता. हरनाज मूळची चंडीगडची असून लारा दत्ता (Lara Dutta) आणि सुश्मिता सेननंतर (Sushmita Sena) हा किताब पटकावणारी हरनाज तिसरी भारतीय विश्वसुंदरी आहे.

हरनाज संधूने मॉडलिंगसोबत पंजाबी चित्रपटांमध्ये कामं केली होती… वयाच्या १७व्या वर्षापासून हरनाजने सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती… तिने टाइम्स फ्रेश फेस मिस चंदीगड २०१७, मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८, फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ आणि लिवा मिस दिवा युनिव्हर्स २०२१ यासह बरेच स्पर्धात्मक किताब जिंकले आहेत. (Bollywood News)
====================================
हे देखील वाचा : Tiger Shroff : बागी ते बागी ३; जाणून घेऊयात बॉक्स ऑफिस कलेक्शन
====================================
दरम्यान, ‘बागी ४’ हा टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या ‘बागी’ चित्रपटांच्या फ्रेंचायझीमधला चौथा भाग असून चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्कांनी रणबीर कपूरच्या Animal चित्रपटाची आठवण झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या… त्यामुळे आता ५ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झाल्यानंतर ‘बागी ४’ प्रेक्षकांच्या पसंतीस येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Baaghi 4 movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi